तेलंगणा व आंध्रातील 300 जणांना मनसेच्या वतीने मोफत धान्याचे वाटप

पंढरपूर,- तेलंगणा व आंध्रप्रेदशातून रोजगाराच्या शोधात आलेल्या भटक्या जमातीच्या सुमारे 300 लोकांना मनसेच्या वतीने आज मोफत जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.
या सर्व लोकांची भटुंबरे (ता.पंढरपूर) येथे तात्पुरत्या राहण्याची सोय करण्यात आली आहे. आज सकाळी मनसेचे प्रदेश सरचिटणीस दिलीप धोत्रे व तहसीलदार डॉ.वैशाली वाघमारे यांच्या उपस्थितीत येथील लोकांना गव्हू, तांदुळ,साखर यासह इतर जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.
कोरोना व्हायरसच्या पार्श्‍वभूमीवर देशभरात लॉक डाऊन जाहीर कऱण्यात आला आहे. त्यामुळे विविध राज्यातील गरीब लोक अडकून पडले आहेत. तेलंगणा व आंध्रप्रदेशातून रोजगाराच्या शोधात सुमारे 300 लोक पंढरपूर परिसरात आले आहेत. सध्या सर्वत्र कडकडीत बंद असल्याने हे सर्व गेल्या तीन ते चार दिवसांपासून उपाशी असल्याची माहिती तहसीलदार डॉ. वैशाली वाघमारे यांना मिळाली होती. त्यांनी तातडीने या लोकांशी संपर्क साधून माहिती घेतली.
त्यानंतर तहसीलदार वाघमारे यांनी या लोकांना मदत करण्याचे आवाहन केले होते. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून मनसेच्या वतीने यर लोकांना पाच किलो गव्हू, पाच किलो तांदुळ, पाच किलो साखर, दोन किलो दाळ, चहा पावड, साबण असे जीवनावश्यक वस्तूंचे एका व्यक्तिला एक महिना पुरेल इतके साहित्य वाटप केले आहे. यावेळी वीटभट्टीवर काम करणार्या मजुरांनाही जीवनावश्यक वस्तूंचे वितरण करण्यात आले. यावेळी मनसेचे तालुका प्रमुख शशिकांत पाटील, तलाठी डोरले उपस्थित होते.
धोत्रे यांनी दिली वैद्यकीय मदत
तेलंगणा राज्यातून आलेल्या भटक्य समाजातील एक वर्षाची मुलगी चार दिवसांपासून निमोनिया सारख्या घातक आजाराने त्रस्त आहे. दोन दिवसापूर्वी त्या मुलीवर खासगी रुग्णालयात उपचार केले. परंतु या कुटुंबाकडे पैसे नसल्याने उपचार थांबले आहेत. ही माहिती मनसेचे प्रदेश सरचिटणीस दिलीप धोत्रे यांना समजताच त्यांनी पंढरपूर येथील एका खासगी रुग्णालयात त्या मुलीला दाखल करण्यास सांगून सर्व वैद्यकीय खर्च देण्याची तयारी दर्शवली आहे.

20 thoughts on “तेलंगणा व आंध्रातील 300 जणांना मनसेच्या वतीने मोफत धान्याचे वाटप

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!