पंढरपुरातील मूर्ती कामगारांना आर्थिक मदत करा: शासनाकडे मनसेची मागणी

पंढरपुर – येथील विविध देव देवतांच्या दगडी मूर्ती तयार करून याच्या विक्रीतून उदरनिर्वाह करणाऱ्या कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे, त्यांना त्वरित आर्थिक मदत करावी या मागणीचे निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने प्रदेश सरचिटणीस दिलीपबापू धोत्रे यांनी पंढरपूरच्या तहसीलदार डॉ. वैशाली वाघमारे यांना दिले आहे.

कोरोनाच्या या संकटामुळे समाजातील सर्वच घटक अडचणीत आले आहेत. यामध्ये दगडातून देव घडविणारा मूर्ती कामगार देखील सुटला नाही. पंढरपुर शहरात अनेक मूर्ती कामगार असून ते दगडाच्या विविध देव देवतांच्या मूर्ती तयार करतात आणि त्या भाविकांना विकून आपला उदरनिर्वाह करतात. मात्र लाँकडाऊन मुळे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर बंद आहे. पंढरपुरला एकही भाविक येत नाही. त्यामुळे मूर्ती खरेदी विक्री बंद झाली आहे. याचा फटका मूर्ती कामगारांना बसल आहे. त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.

बांधकाम कामगारांना ज्याप्रमाणे शासनाने मदत केली त्याच प्रमाणे या मूर्ती कामगारांनाही मदत करावी तसेच श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने काही मूर्ती विकत घेऊन यि कामगारांना सहाय्य करावे अशी मागणी मनसेच्या वतीने प्रदेश सरचिटणीस दिलीपबापू धोत्रे यांनी केली आहे. यावेळी तालुका अध्यक्ष शशिकांत पाटील, अर्जुन जाधव,मूर्ती कामगार संघटनेचे शिवाजीराजे धोत्रे, शंकर चौगुले, अंकुश शेळके, दत्तात्रय धोत्रे, राजू चौगुले, सचिन निंबाळकर, मारुती शेळके, अनिल धोत्रे, मारुती चौगुले, सनी धोत्रे, राजू पवार, संजय चौगुले, विठ्ठल शेळके उपस्थित होते.

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!