पंढरपूर विधानसभा पोटनिवडणूक : निवडणूक निरीक्षक म्हणून दिब्य गिरी यांची नियुक्ती

पंढरपूर दि. 31: पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भारत निवडणूक आयोगाने निवडणूक निरीक्षक म्हणून भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी दिब्य प्रकाश गिरी यांची नियुक्ती केली असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी गजानन गुरव यांनी दिली.
श्री. गिरी यांचे पंढरपूर शासकीय विश्रामगृह येथे वास्तव्य असून, त्यांचा मोबाईल क्रमांक 8459148384 आहे. त्यांचे संपर्क अधिकारी म्हणून आत्माचे प्रकल्प उपसंचालक मदन मुकणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांचा मोबाईल क्रमांक 9403771256 आहे.
निवडणुकीच्या कोणत्याही तक्रारी संदर्भात वरील भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा, असे आवाहन श्री. गुरव यांनी केले आहे.

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!