राज्यात शनिवारपासून शासकीय रुग्णालयांमधील रुग्णांना मिळणार मोफत रक्त : आरोग्यमंत्र्यांची घोषणा

*आरोग्यमंत्री राजेश टोपे व खासदार सुप्रिया सुळे यांनी केले रक्तदान*

मुंबई, दि.१०: राज्यात शनिवार दि. १२ डिसेंबरपासून सर्व शासकीय रुग्णालयांमधील रुग्णांना मोफत रक्त मिळणार असल्याची घोषणा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज येथे केली. रक्त तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री श्री. टोपे व खासदार सुप्रिया सुळे यांनी आज रक्तदान करून नागरिकांना रक्तदानासाठी आवाहन केले.

दुपारी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठाण येथे राज्य रक्तसंक्रमण परिषदेच्या माध्यमातून रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. आरोग्यमंत्री श्री. टोपे यांच्यासह खासदार श्रीमती सुळे आणि कार्यकर्त्यांनी रक्तदान केले. यावेळी आरोग्य संचालक डॉ. साधना तायडे, राज्य रक्त संक्रमण परिषदेचे डॉ. अरूण थोरात आदी उपस्थित होते.
‘आधी केले मग सांगितले’ या उक्तीनुसार आरोग्यमंत्री श्री. टोपे यांनी आज रक्तदान करून त्याद्वारे नागरिकांना रक्तदान करण्याचा संदेश दिला.
यावेळी आरोग्यमंत्री म्हणाले, शासकीय रुग्णालयात रक्तावरील प्रकियेसाठी ८०० रुपये शुल्क आकारले जाते. आता शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या रुग्णाला रक्ताची गरज भासल्यास त्याला मोफत रक्त उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला. राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या माध्यमातून हा उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.
एखाद्याचा जीव वाचविण्यासाठी रक्त हा घटक किती महत्वाचा आहे याची सर्वांना जाणीव आहे.राज्यात सुमारे ३४४ ब्लड बँक कार्यरत आहेत. त्यामध्ये काही दिवस पुरेल एवढाच रक्तसाठा उपलब्ध आहे. कोरोनामुळे महाविद्यालये बंद आहेत. खासगी कंपन्यांचे वर्क फ्रॉम होम सुरू आहे आणि सोशल डिस्टंसिंगच्या मर्यादेमुळे रक्तदान शिबीरे आयोजित करण्यावर मर्यादा येत आहेत. यासाऱ्यांमुळे रक्तदान कमी होत आहे. एरवी महाराष्ट्र देशात रक्त संकलानात अग्रेसर आहे. मात्र आता कोरोनामुळे रक्तटंचाईला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे रक्तदान करणे हाच एक पर्याय असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.
रक्त तयार करता येत नाही आणि संकलन केलेले रक्त दीर्घकाळ साठवता येत नाही त्यामुळे सातत्याने रक्तदान शिबिरांचे आयोजन करणे आवश्यक आहे. ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त १३ ते २० डिसेंबर दरम्यान स्वाभिमान सप्ताह साजरा केला जाणार असून त्यानिमित्त प्रत्येक तालुक्यात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. नागरिकांनी आपल्या वाढदिवशी, लग्नाच्या वाढदिवशी अशा विविध प्रसंगाचे औचित्य साधून वर्षातून दोन वेळेस रक्तदान करण्याचे आवाहनही आरोग्यमंत्र्यांनी केले.

10 thoughts on “राज्यात शनिवारपासून शासकीय रुग्णालयांमधील रुग्णांना मिळणार मोफत रक्त : आरोग्यमंत्र्यांची घोषणा

  • April 13, 2023 at 7:39 pm
    Permalink

    Definitely believe that which you stated. Your favorite reason appeared to be on the net the easiest thing to be aware of. I say to you, I certainly get irked while people think about worries that they plainly don’t know about. You managed to hit the nail upon the top and defined out the whole thing without having side-effects , people can take a signal. Will probably be back to get more. Thanks

  • April 14, 2023 at 4:37 am
    Permalink

    Outstanding post, I believe website owners should larn a lot from this website its rattling user pleasant.

  • May 1, 2023 at 3:26 am
    Permalink

    After all, what a great site and informative posts, I will upload inbound link – bookmark this web site? Regards, Reader.

  • May 3, 2023 at 7:15 am
    Permalink

    Its superb as your other posts : D, regards for putting up.

  • May 6, 2023 at 8:41 am
    Permalink

    I?¦ve recently started a web site, the info you provide on this site has helped me tremendously. Thanks for all of your time & work.

  • June 5, 2023 at 7:28 am
    Permalink

    Some truly interesting points you have written.Aided me a lot, just what I was searching for : D.

  • Pingback: อนิเมะพากย์ไทย

  • Pingback: briansclub

  • August 24, 2023 at 12:44 pm
    Permalink

    Hi there! I’m at work surfing around your blog from my new iphone 3gs! Just wanted to say I love reading through your blog and look forward to all your posts! Carry on the excellent work!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!