रुग्णसंख्या वाढतेय .! रविवारी सोलापूर जिल्हा ग्रामीणमध्ये 118 कोरोनाबाधित आढळले, 2 जण मयत

पंढरपूर – रविवारी 14 मार्च रोजी आलेल्या अहवालानुसार सोलापूर जिल्हा ग्रामीणमध्ये ( महापालिका क्षेत्र वगळून) 118 कोरोनाबाधितांची भर पडली आहे. तर 2 रुग्णांनी कोरोनामुळे प्राण गमावले आहेत.
सोलापूर ग्रामीणमध्ये रविवारी सर्वाधिक रूग्ण बार्शी तालुक्यात 29 तर यापाठोपाठ माढा 25, पंढरपूर 21 तर करमाळा तालुक्यात 18 आढळले आहेत. जिल्हा ग्रामीणचा विचार केला येथे 41 हजार 604 रूग्ण आजवर आढळून आले असून 1198 जण या आजारात दगावले आहेत. सध्या 850 जणांवर उपचार सुरू आहेत तर 39 हजार 556 जण या आजारातून बरे झाले आहेत. आज 40 जणांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे.
सोलापूर जिल्हा ग्रामीणमध्ये सर्वाधिक कोरोनाबाधित पंढरपूर तालुक्यात आढळून आले आहेत. आजवर या तालुक्यात 8355 रूग्ण आढळून आले असून 244 जणांनी येथे प्राण गमावले आहेत. सध्या 125 जणांवर उपचार सुरू आहेत तर 7986 जणांनी कोरोनावर मात केली आहे.
आज पंढरपूर शहरात 8 तर तालुक्याच्या ग्रामीण भागात 13 रुग्ण आढळले आहेत.
WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!