लॉकडाऊनमध्ये मनसेने दिला अनेकांना मदतीचा हात

पंढरपूर – कोरोनामुळे लॉकडाऊनच्या काळात गरजूंना मदतीचा हात देण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने पंढरपूर शहर व तालुक्यात ठिकठिकाणी जीवनावश्यक वस्तूंचे वितरण करण्यात आले.
मनसेचे प्रदेश सरचिटणीस दिलीप धोत्रे व त्यांच्या सहकार्यांनी गरजूंना मदतीचा हात दिला असून यात परप्रांतीय मजूर, दगड खाणीतील कामगार, भंगार गोळा करणारे लोक, गरीब कलावंत यांच्यासह झोपडपट्टीत राहणारे गोरगरीब यांना धान्य व जीवनावश्यक वस्तूचे वितरण गेल्या पंधरा दिवसापासून सुरू ठेवले आहे. पंढरपूर, टाकळी सिंकदर, करकंब, शिरढोण, अनवली, कासेगाव यासह विविध ठिकाणी मनसेने मदत पोहोचविली आहे.
शनिवारी गादेगाव (ता.पंढरपूर) येथे आशा सेविका व गरीब कुटुंबाना मनसेच्या वतीने धान्य आणि जीवनावश्यक वस्तूंचे वितरण ग्रामपंचायत सदस्य गणेश बागल आणि तलाठी श्रीकांत कदम यांच्या हस्ते मदतीचे वाटप करण्यात आले. आशा सेविकांना मास्क व सॅनिटायझर तर गादेगाव चेक पोस्टवरील पोलीस बांधवांना पाणी, बिस्कट, मास्कचे वितरण करून अत्यावश्यक सेवा पुरविणार्‍यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
यावेळी दिलीप धोत्रे, शशिकांत पाटील, अनिल बागल, गणपत मोरे, वैद्यकीय अधिकारी अनिशा तांबोळी, जेम्स फिलिप्स, सिध्देश्‍वर गरड उपस्थित होते.

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!