लोटस इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेजचा बारावीचा निकाल १०० टक्के

श्वेता जाधव

पंढरपूर -कासेगाव (ता.पंढरपूर) येथील श्री विठ्ठल इन्स्टिट्यूट ऑफ प्रोग्रसिव एज्युकेशन संचलित, लोटस इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेजचा बारावीचा निकाल शंभर टक्के लावून विजयाची परंपरा कायम राखली आहे.

साक्षी मोरे

सोलापूर जिल्ह्यात नवनवीन शैक्षणिक क्रांती घडवून नेहमी आपल्या शैक्षणिक प्रगतीचा आलेख वाढता ठेवणारे लोटस इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज हे प्रसिद्ध आहे. लोटस इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजच्या इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांनी शैक्षणिक वर्ष २०१९-२० महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक मंडळ यांच्या अंतर्गत घेण्यात आलेल्या परीक्षेत उज्ज्वल यश प्राप्त केले असल्याची माहिती लोटस इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेजच्या प्राचार्या डॉ.जयश्री चव्हाण यांनी दिली.

कीर्ती सवळी

लोटस इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज नेहमीच विद्यार्थ्यांना सर्वांगीण विकासासाठी सतत प्रयत्न करीत असून बारावीच्या परीक्षेत श्वेता जाधव ७२.९२ टक्के प्रथम क्रमांक,साक्षी मोरे ७१.८५ टक्के द्वितीय क्रमांक, कीर्ती सवळी ७०.१५ टक्के तृतीय क्रमांक, जास्मिन शेख ६८ टक्के विश्वनाथ माळी ६८ टक्के जयराज देशमुख ६७.५४ टक्के एवढे गुण मिळवून यशस्वी झाले आहेत. विशेष म्हणजे अनुपा घेरडे या विद्यार्थिनीला मराठी विषयात ८७ गुण तर साक्षी मोरे, विश्वनाथ माळी व श्वेता जाधव यांना गणित विषयात प्रत्येकी ८२ गुण, जयराज देशमुख इंग्लिश विषयात ७७ गुण मिळवून यश संपादन केले आहे. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे सचिव डॉ. बी.पी.रोंगे, अध्यक्ष बी.डी रोंगे, उपाध्यक्ष एच.एम. बागल, खजिनदार दादासाहेब रोंगे, संस्थेचे पदाधिकारी, प्राचार्या, शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी, पालक व विद्यार्थी यांनी अभिनंदन केले आहे.

जास्मिन शेख

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!