व्यावसायिकांच्या मदतीसाठी निशिगंधा बँकेने आणली “कोविड-19” कर्ज योजनाचे

पंढरपूर , दि.20 – कोरोनामुळे लाँकडाऊन पुकारले गेले व या कालावधीत व्यवसाय ठप्प झाल्याने व्यापारी अडचणीत सापडले. त्यांना आता व्यवसाय पुन्हा उभा करताना हातभार लागावा, भांडवल उपलब्ध व्हावे या हेतूने निशिगंधा बँकेने “कोविड-19” ही कर्ज योजना आणलेली आहे.

सदर योजने अंतर्गत पात्र असणार्‍या छोटया व्यापार्‍यांना रू.25000 ते 50000 पर्यंतचे कर्ज सुलभ पध्दतीने मिळू शकते. या व्यापार्‍यांना व्यवसाय उभा करणेसाठी कालावधी मिळावा म्हणून सुरूवातीचे तीन महिने हप्ता न भरण्याची सवलत देण्यात येणार आहे. तीन महिन्यानंतर सदर कर्जासाठी हप्ता वसुली सुरू होणार आहे. कर्जाचा हप्ता बँकेच्या प्रतिनिधी मार्फत घरी/दुकानी येऊन पिग्मीव्दारे अथवा समक्ष बँकेत देखील स्वीकारण्याची सोय करण्यात आलेली आहे. सर्व पुर्तता झालेपासून जास्तीत जास्त 3 दिवसांत सदरच्या कर्जाची रक्कम सबंधिताच्या हातात पडेल अशी सोय करण्यात आलेली आहे, तरी सर्व गरजूंनी या योजनेचा जास्तीत जास्त फायदा घ्यावा असे आवाहन चेअरमन कल्याणराव काळे यांनी केले आहे.

गेल्या नोव्हेंबर महिन्यापासून जगभरात कोविड-19 (कोरोना) या संसर्गजन्य रोगाने थैमान घातले आहे. आणि या साथरोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी म्हणून केंद्र सरकार व राज्य सरकार ने संपूर्ण देशात व राज्यात टाळेबंदी जाहीर केली. सर्व उद्योग-धंदे या टाळेबंदीमुळे ठप्प झाले होते. छोटया व्यापार्‍यांचे, हातावर पोट असणार्‍यांचे तर खूपच हाल या टाळेबंदीत झाले आहेत.

One thought on “व्यावसायिकांच्या मदतीसाठी निशिगंधा बँकेने आणली “कोविड-19” कर्ज योजनाचे

  • March 17, 2023 at 10:06 am
    Permalink

    Howdy very cool site!! Man .. Beautiful .. Superb .. I’ll bookmark your web site and take the feeds additionally?KI’m glad to search out a lot of helpful information here within the post, we need work out extra techniques in this regard, thanks for sharing. . . . . .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!