पंढरपूर – शुक्रवार 19 मार्च रोजी आलेल्या अहवालानुसार सोलापूर शहरात 130 कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले असून एक जणाचा मृत्यू झाला आहे तर जिल्हा ग्रामीणमध्ये (शहर वगळून) 149 रूग्ण आढळून आले आहेत व एक जणांने प्राण गमावले आहेत.
सोलापूर शहरात 916 चाचण्या झाल्या असून यापैकी 786 चाचण्या निगेटिव्ह तर 130 चाचण्या पॉझिटिव्ह आहेत. आजवर शहरात एकूण 13 हजार 660 रूग्ण सापडले असून 682 जणांचा या आजारात मृत्यू झाला आहे. सध्या 1003 रूग्ण उपचार घेत आहेत तर आजवर एकूण 11 हजार 975 जणांनी शहरात कोरोनावर मात केली आहे.
ग्रामीण भागात 3698्र4 चाचण्या झाल्या असून यापैकी 3545 निगेटिव्ह तर 149 पॉझिटिव्ह आहेत. पंढरपूर तालुक्यातील टाकळी येथील एका महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद आहे. आज 53 जणांनी कोरोनावर मात केली आहे.
जिल्हा ग्रामीणमध्ये करमाळ्यात 60 ,बार्शी 43 तर पंढरपूर तालुक्यात 14 कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले आहेत. आजवर ग्रामीणमध्ये एकूण 42 हजार 289 रूग्ण आढळून आले असून यापैक्ी 1205 जणांचा मृत्यू झाला आहे. 39 हजार 892 जणांनी कोरोनावर मात केली आहे तर 1192 जणांवर उपचार सुरू आहेत.
ग्रामीणमध्ये आजवर सर्वाधिक रूग्ण पंढरपूर तालुक्यात 8442 आढळून आले असून 245 जणांनी या आजारात प्राण गमावले आहेत. 8025 जणांनी कोरोनावर मात केली असून सध्या 172 जणांवर उपचार सुरू आहेत. आज 14 रूग्ण आढळले असून यात शहरात 9 तर तालुक्यात 5 जणांची नोंद आहे.
I have recently started a site, the info you provide on this website has helped me tremendously. Thank you for all of your time & work.