सुधाकरपंत परिचारक यांच्या निधनाने सहकार, समाजकारणातील मार्गदर्शक नेतृत्व हरपले : मुख्यमंत्री उध्दव ठाकरे

मुंबई, दि. १८ :- ‘ सहकार, शिक्षण क्षेत्रातील कामाने समाजकारणात आणि जनतेत आदराचे स्थान मिळविलेल्या ज्येष्ठ नेते माजी आमदार सुधाकरपंत परिचारक यांच्या निधनामुळे मार्गदर्शक नेतृत्व हरपले आहे, अशी श्रद्धांजली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वाहिली आहे.

मुख्यमंत्री शोकसंदेशात म्हणतात, सोलापूर जिल्ह्याच्या समाजकारणात माजी आमदार सुधाकरपंत परिचारक यांना आदराचे स्थान होते. त्यांनी पंढरपूर मतदार संघाचे विधानसभेत दीर्घकाळ प्रतिनिधित्व केले. सहकारी साखर कारखाना, बँक आणि शैक्षणिक क्षेत्रातील कामाने त्यांनी सोलापूर जिल्ह्याच्या विकासासाठी योगदान दिले. त्यांच्या निधनामुळे सहकार, समाजकारणातील मार्गदर्शक नेतृत्व हरपले आहे. माजी आमदार सुधाकरपंत परिचारक यांना विनम्र श्रद्धांजली.

लोकसेवा व ग्रामीण विकासाला वाहून घेतलेले नेतृत्व हरपले : उपमुख्यमंत्री

मुंबई, दि.18: ज्येष्ठ नेते, माजी आमदार सुधाकरपंत परिचारक यांच्या निधनाबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दुःख व्यक्त केले असून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. लोकसेवेला, ग्रामीण विकासाला वाहून घेतलेले त्यांचे नेतृत्व होते. त्यांच्या निधनाने सहकार क्षेत्रातील मार्गदर्शक नेतृत्व हरपले आहे. राजकीय, सामाजिक, सहकार क्षेत्रातील त्यांचे योगदान नेहमी स्मरणात राहिल, परिचारक कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सर्व सहभागी आहोत. अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.

सहकार क्षेत्रातील जेष्ठ नेतृत्व हरपले : पालकमंत्री भरणे

पंढरपूर, दि. १८ :- माजी आमदार सुधाकरपंत परिचारक यांच्या निधनाने सहकार, कृषी, शिक्षण क्षेत्रात भरीव योगदान देणारे जेष्ठ नेतृत्व हरपले आहे, अशा शब्दात सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आदरांजली अर्पण केल्या आहेत.
पालकमंत्री भरणे यांनी शोकसंदेशात नमूद केले आहे की, जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्राच्या सहकार चळवळीत सुधाकर पंत परिचारक यांचा मोठा वाटा होता. सोलापूर जिल्ह्याला सहकार क्षेत्रात अग्रेसर ठेवण्यात त्यांची भूमिका महत्वाची होती. सहकाराची जाण असलेला नेता हरपल्याने कधीही भरुन न येणारे नुकसान झाले आहे. त्यांचे सहकार राजकीय, सामाजिक क्षेत्रातील योगदान नेहमी स्मरणात राहिल. जिल्हा बँकेच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांच्या व शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी कठोर परिश्रम घेतले. त्यांनी घालून दिलेला आदर्श व सहकारातील मापदंड कायम प्रेरणास्त्रोत ठरेल.

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!