सोमवारी पंढरपूर शहर व तालुक्यात 61 कोरोना रूग्ण वाढले

पंढरपूर – आज सोमवारी 27 जुलै रोजी पंढरपूर शहर 59 व ग्रामीणमध्ये 2 असे 61 कोरोना रुग्ण वाढले असून एकूण बाधितांची संख्या 420 इतकी झाली आहे. अशी माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. एकनाथ बोधले यांनी दिली. आज 26 जणांनी कोरोनावर मात केली आहे.
आज 182 अहवाल मिळाले पैकी 121 निगेटिव्ह आहेत. 61 पाँझिटिव्ह आहेत. अद्याप 211 अहवाल प्रलंबित आहेत.
आज 26 जणांनी कोरोनावर मात केली आहे , त्यांना घरी पाठविण्यात आले. आजवर 147 जण बरे झाले आहेत. तर 7 जण मयत आहेत. शहरातील 202 तर ग्रामीण मधील 63 व इतर तालुक्यातील 1 असे 266 जणांवर उपचार सुरू आहेत.

ग्रामीण भागात नेपतगाव व करोळे गावात प्रत्येकी 1 रुग्ण आढळला आहे. तर 59 रुग्ण शहरातील आहेत. आज rapid 34 test झाल्या यात 7 पाँझिटिव्ह तर 148 अहवाल प्राप्त असून 54 पाँझिटिव्ह आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!