आमदार भालके यांनी घेतली राज ठाकरेंची भेट

पंढरपूर –  पंढरपूर- मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँगे्रस पक्षाकडून विजयी झालेले आमदार भारत भालके यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांची मुंबईत त्यांच्या निवासस्थानी जावून भेट घेतली. मनसेने पंढरपूर मतदारसंघात भालके यांना पाठिंबा दिला होता.आमदार भालके यांनी गुरूवारी सकाळी राज ठाकरे यांची भेट घेतली. त्यांच्या समवेत मनसेचे सहकारसेना प्रदेशाध्यक्ष दिलीप धोत्रे, प्रशांत गिड्डे ही उपस्थित होते. यावेळी भालके यांनी ठाकरे यांचा सत्कार केला. पंढरपूर मतदारसंघात मनसेने आपला उमेदवार उभा केला नव्हता. येथे राष्ट्रवादीला पाठिंबा जाहीर करण्यात आला होता. या मतदारसंघातून दिलीप धोत्रे यांनी लढण्याची तयारी केली होती. दरम्यान भालके यांनी विधानसभेला विजय मिळविल्यानंतर आज राज ठाकरे यांची सदिच्छा भेट घेवून आभार व्यक्त केले. ठाकरे यांनी देखील भालके यांचे स्वागत करत त्यांना विजयाबद्दल शुभेच्छा दिल्या तसेच यावेळी विविध विषयांवर चर्चा झाली.
WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!