पंढरपूर – गुरूवारी आमलकी एकादशी निमित्त पंढरपूरच्या श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरात एक टन फुलं व शंभर किलो द्राक्षांची आरास करण्यात आली आहे. हंगामानुसार फळांची आरास करण्याचा हा प्रकार भक्तांना आवडत असल्याचे दिसत आहे.
शेवंत, अॅरकेड, अॅन्थेनियम, केळींच्या खुंट तसेच द्राक्ष या सजावटीसाठी वापरली गेली आहेत. फुल आणि फळांची रंगसंगती करून ही आरास तयार करण्यात आली आहे. ही आरास रांजणगाव येथील नानासाहेब दिनकर पाटील यांनी केली आहे. तर आरास साकारण्याचे काम मंदिरे समितीचे कर्मचारी व साई डेकोरेटर्सचे शिंदे बंधू यांनी केले आहे.
ही आरास करण्यासाठी एक टन फुलं व 100 किलो द्राक्षांचा वापर केला गेला आहे. प्रत्येक विशेष दिवशी मंदिरे समितीच्या वतीने अशी आरास केली जाते. राज्यभरातील भक्त ही सेवा बजावतात.