आषाढीसाठी संचारबंदीचे नियम जाहीर, तीन स्तरात शहर, गोपाळपूर व आजुबाजूच्या दहा गावांसाठी नियमावली , बससेवा बंद राहणार

पंढरपूर – संचारबंदी पाहता आषाढी यात्रा कालावधीत 17 जुलै दुपारी दोन ते 25 जुलै दुपारी चारपर्यंत जिल्ह्यातील एसटी बसेस तसेच खासगी बसेसना प्रवासी वाहतुकीसाठी पंढरपूरमध्ये येता येणार नाही. तसेच पंढरपूर शहर व गोपाळपूर यासह नगरप्रदक्षिणा मार्गाच्या आतील बाजू ,वाळवंट, मंदिर व घाट भाग यासह आजुबाजूच्या दहा गावातील नागरिकांसाठी ही नियम जाहीर करण्यात आले असून त्यांना ठरवून दिलेल्या कालावधीत वारीसाठी, संत पादुकांच्या दर्शनासाठी तसेच विठ्ठल मंदिरात परिसरात व चंद्रभागा वाळवंटात स्नानाकरीता येण्यास मनाई करण्यात आली. याचे तारीख व वेळेनिहाय वेळापत्रक जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी जाहीर केले आहे.
संचारबंदी कालावधीत अत्यावश्यक सेवेतील अधिकारी व कर्मचारी तसेच मंदिर समितीचे पासधारक यासह शासकीय अधिकारी व कर्मचारी , पास दिलेले पालखी सोहळे तसेच जीवनावश्यक सेवेतील दुकान तसेच आषाढीत पूर्वापार परंपरा व साजरे होणारे उत्सव यांना स्थानिक परिस्थितीनुसार परवानगी देण्याचा निर्णय राखून ठेवण्यात आला आहे.
WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!