आ. प्रशांत परिचारक यांच्या वाढदिवसानिमित्त युटोपियनवरील शिबिरात 101 जणांचे रक्तदान

पंढरपूर -. विधानपरिषदेचे आमदार व युटोपियन शुगर्स चे मार्गदर्शक प्रशांत परिचारक यांच्या वाढदिवसानिमित्त मंगळवार 11 आँगस्ट रोजी मंगळवेढा तालुक्यातील कचरेवाडी येथील युटोपियन शुगर्स लि. येथे भरविण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात 101 जणांनी सहभाग नोंदविला.

पंढरपूर ब्लड बँक यांच्या सहाय्याने या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.याचे उद्घाटन माजी सैनिक शिवाजीराव माने यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी युटोपियन शुगर्स चे सर्व अधिकारी, खाते-प्रमुख व कर्मचारी उपस्थित होते. या शिबिरात १०१ रक्तदात्यांनी सहभाग घेतला होता. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्वच्छ वातावरणात व गर्दी टाळत सोशल डिस्टन्सिंगचे पालन करीत या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असणार्‍या युटोपियन शुगर्सद्वारे दरवर्षी विविध समाज उपयोगी उपक्रम राबविले जातात. रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे तसेच कोरोना साथीमुळे राज्यात रक्याची आवश्यकता आहे. रोज पाच हजार रक्त पिशव्यांची गरज भासत आहे. यासाठी राज्य सरकार रक्तदान शिबिर घेण्याचे आवाहन करत आहे. या पार्श्वभूमीवर युटोपियन शुगरने यचे आयोजन केले होते. सर्व रक्तदात्यांचे युटोपियन शुगर्स प्रशासनाच्या वतीने आभार मानण्यात आले.रक्तदान केलेल्या व्यक्तींना सँनिटायझर,हेल्मेटट,पाण्याचे जार या सारख्या वस्तू भेट म्हणून देण्यात आल्या. सदर रक्तदान शिबिरास पंढरपूर अर्बन बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी उमेश विरधे यांनी सदिच्छा भेट देऊन पाहणी केली.

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!