उजनीतून इंदापूरला पाच टीएमसी पाणी देण्याची योजना रद्द झाल्याचे लेखी पत्र शासनाने दिले
पंढरपूर – उजनी धरणात पुणे जिल्ह्यातून येणाऱ्या सांडपाण्यापैकी ५ टीएमसी पाणी इंदापूर तालुक्यातील शेटफळेगढे योजनेसाठी देण्याचा निर्णय जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी यापूर्वीच रद्द केला होता. आता याबाबतचे लेखी पत्र शासनाच्या सचिवांनी काढले आहे.
इंदापूर ला पाणी देण्यास सोलापूर जिल्ह्यातून विरोध होत होता. योजना रद्द झाल्याचे लेखी पत्र हवे यासाठी येथे आंदोलन सुरु आहेत. दरम्यान जलसंपदा विभागाने २२ एप्रिल रोजी इंदापूर तालुक्याला पाणी देण्यास मंजुरी दिलेले शासन पत्र आज २७ मे रोजी रद्द केले आहे.