उजनीतून भीमा नदीत 5 हजार क्युसेकने पाणी सोडले, धरण 109.33%
पंढरपूर– सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असणाऱ्या उजनी धरणातील पाणीसाठा 109 टक्के झाला असून दौंड येथून येणाऱ्या पाण्याचा विसर्ग 9000 क्युसेक पेक्षा जास्त होऊ लागला आहे. त्यामुळे बुधवार 2 सप्टेंबर रोजी रात्री नऊ वाजल्यापासून उजनी धरणातून भीमा नदीच्या पात्रात ,चार दरवाजामधून 5000 क्युसेक वेगाने पाणी सोडण्यास सुरुवात झालीआहे.
धरणाचे 1, 8, 9 व 16 या क्रमाकांचे हे 4 दरवाजे उघडण्यात आले आहेत.
दौंडच्या विसर्गात वाढ झाल्यास उद्या सकाळपर्यंत 10000 क्युसेकपर्यंत यात वाढ करण्यात येईल त्यामुळे आता यापुढे भीमा नदीच्या पात्रात पाँवर हाऊस मधील सोळाशे क्युसेक व आता सोडण्यात येणारे 5000 क्युसेक असे एकूण 6500 क्युसेक विसर्ग असेल. पाणी सोडण्याची प्रक्रिया पाहता भीमा नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क रहावे असे आवाहन जलसंपदा चे अधीक्षक अभियंता धीरज साळे यांनी केले आहे.
धरणाची स्थिती
पाणी पातळी: 497. 250 मी.
एकूण साठा : 3463 .36 दलघमी
(122 .23 टीएमसी)
उपयुक्त साठा: 1660 .55 दलघनमी
(58. 57 टीएमसी)
टक्केवारी 109 .45%)
विसर्ग………….
दौंड येथून 8900 क्युसेक
बंडगार्डन 8928क्युसेक
धरणातून पाण्याचा विसर्ग………..
कालवा 2400 क्युसेक, बोगदा 900 क्युसेक , वीज निर्मिती 1600 क्युसेक, भीमा नदी 5000 क्युसेक, सीना माढा सिंचन योजना 299 क्युसेक.