उजनीवर मध्यम स्वरूपाचा पाऊस, दौंडची आवक 2 हजार 223 क्युसेक

पंढरपूर – सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असणार्‍या उजनी धरणावर पावसाने हजेरी लावली असून मागील चोवीस तासात 23 मिलीमीटरची तेथे नोंद आहे. जून महिन्यपापासून आजवर 169 मि.मी. पर्जन्यमान झाले आहे. दौंड येथून धरणात येणारी आवक 2 हजार 223 क्युसेक इतकी कमी असून प्रकल्प वजा 8.82 टक्के अशा स्थितीत आहे.
भीमा खोर्‍यात पावसाचा जोर नसल्याने उजनीत येणारी आवक कमी आहे. यामुळेच जुलै महिन्याचा दुसरा आठवडा आला तरी अद्याप हे धरण अद्याप उपयुक्त पातळीत भरण्यास सुरूवातही झालेली नाही. हा प्रकल्प मृतसाठ्यातून बाहेर येण्यासाठी 4.72 टीएमसी पाण्याची गरज आहे. यानंतर तो उपयुक्त पातळीत भरण्यास सुरूवात होईल. या प्रकल्पावर मागील दोन तीन दिवसांपासून पाऊस पडत असून 8 रोजी 23, 9 जुलैला 8 तर आज 10 रोजी पुन्हा 23 मिलीमीटर पावसाची नोंद आहे.
WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!