उजनीवर ६९ मि.मी. पाऊस, जूनमधील पर्जन्यमान १८२ मि.मी.

Ui – सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असणार्‍या उजनी धरणावर आज ६९ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. या जून महिन्यात १८२ मि.मी. एकूण पर्जन्यमान झाले आहे. दरम्यान भीमा व नीरा खोर्‍यात
आज अन्य धरणांवर पावसाची दमदार पावसाची नोंद नाही.

विसापूर, नाझरे धरणांवर केवळ ७ मि.मी. पर्जन्यमान नोंदले गेले आहे. पावसाची नोंद आहे. आज २९ जून रोजी धरणाची स्थिती ही वजा १६.१४ टक्के अशी आहे. मागील काही दिवसात भीमा खोर्‍यात चांगला पाऊस झाला आहे. पुणे परिसर तसेच भीमा नदीच्या खोर्‍यात पर्जन्यामुळे उजनीत दौंडजवळून पाणी मिसळत होते. आता दौंडचा विसर्ग बंद आहे. उजनीची पाणीपातळी ४८९. ७१० मीटर असून धरण उपयुक्त पातळीत भरण्यास सुरूवात होण्यासाठी आणखी २४४.९४ दशलक्ष घनमीटर पाण्याची गरज आहे.

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!