उजनी जलाशयावर २८ मि.मी. पाऊस, धरणाची स्थिती वजा २२.५३ %
पंढरपूर – सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असणाऱ्या उजनी जलाशयावर आज २८ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. धरणातील पाणी स्थिती वजा २२.५३ टक्के आहे. उजनीच्या डेड स्टाँकमधील ३४१ दशलक्ष घनमीटर पाण्याचा वापर झाला आहे.
पावसाळा सुरू झाल्यापासून उजनी जलाशयावर एकूण ८१ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जलाशयाची पाणीपातळी ४८९.१४ मीटर आहे.
दरम्यान मागील चोवीस तासात भीमा व नीरा खोर्यातील धरणांवर झालेला पाऊस- आंध्रा ६६ मि.मी., भामा आसखेडा ४६, वडीवळे १६, कलमोडी ३३, डिंभे ३५, नीरा खोरे- नाझरे २२, वीर १९ मि.मी.