उद्योजक अभिजित पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त 605 जणांचे रक्तदान

पंढरपूर– धाराशिव साखर कारखाना युनिट 1, 2 व 3 चे अध्यक्ष अभिजित पाटील यांच्या 37 व्या वाढदिवसानिमित्त पंढरपूर तालुक्यात मा.अभिजित आबा पाटील फाउंडेशनच्या माध्यमातून पटवर्धन कुरोली व विसावा आढीव येथे झालेल्या रक्तदान शिबिरात 155 जणांनी सहभाग घेतला. दरम्यान दोन दिवसात झालेल्या शिबिरांमध्ये एकूण 605 जणांनी रक्तदान केले.


डिव्हीपी उद्योग समुहाचे चेअरमन अभिजित पाटील यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत युवकांनी तालुक्यात रक्तदानाची ही चळवळ राबविली आहे. रक्तदान हे श्रेष्ठदान वाचवतो इतरांचे प्राण… हा संदेश देण्यात आला होता. कोरोनाच्या या संकट काळात रक्ताचा तुटवडा भासत असून यावेळी रक्तदानाची गरज आहे. हे ओळखून अभिजित पाटील यांनी रक्तदान शिबिर घेण्याचे आवाहन केले होते. दरम्यान या शिबिरात सहभागी झालेल्या सर्व रक्तदात्यांचे पाटील यांनी आभार मानले आहेत.
दरम्यान अभिजित पाटील हे सामाजिक कार्यात अग्रेसर असून त्यांनी कोरोनाच्या काळात पंढरपूर शहर व तालुक्यात मोठे काम उभारले आहे. कोरोनाविरोधात लढणार्‍या योध्द्यांसाठी त्यांनी आपल्या डिव्हीपी उद्योग समुहातील विठ्ठल कामत हॉटेलमधून फूड पॅकेटसची सोय केली होती. याच बरोबर थर्मल स्क्रिनिंग मशीन प्रशासनास उपलब्ध करून देत ग्रामीण भागातील लोकांचे थर्मल स्क्रिनिंग करण्यासाठी पुढाकार घेतला.

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!