कंटेन्मेंट झोनमधील नागरिकांची घरोघरी जावून आरोग्य तपासणी, नगरसेवक विक्रम शिरसट यांचा पुढाकार

पंढरपूर – शहर व तालुक्यात कोरोना आजाराचा प्रादुर्भाव वाढत चालला असून येथील आण्णाभाऊ साठे नगर व 197/ब येथे एकाच दिवशी 22 रूग्ण पॉझिटिव्ह आल्यामुळे हा परिसर कंटेन्मेट झोन म्हणून घोषित करण्यात आला. तसेच याच परिसरात पंढरपूर नगरपरिषदेचे सफाई कर्मचारी मोठ्या संख्येने राहत असल्यामुळे नगरसेवक विक्रम शिरसट यांनी खबरदारीची उपाययोजना म्हणून आरोग्य कर्मचार्‍यांमार्फत येथील नागरिकांची आरोग्य तपासणी करून घेतली.
पंढरपूर तालुक्यात कोरोना रूग्णांची संख्या 500 च्या आसपास पोहोचली आहे. शहरातील मध्यवस्ती असलेल्या अण्णाभाऊ साठे नगर व 197/ब रामबाग येथे दोन दिवसापूर्वी 22 कोरोना रूग्ण आढळून आले. यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. तनगरसेवक विक्रम शिरसट यांनी आरोग्य अधिकारी डॉ. बजरंग धोत्रे व कर्मचार्‍यांच्या मदतीने परिसरातील नागरिकांची आरोग्य तपासणी करून घेवून ज्या नागरिकांना ताप, सर्दी, खोकला आहे अशा प्रकारची लक्षणे आहेत त्यांना योग्य उपचार देण्यात आले व काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले. तसेच संपूर्ण परिसरात जंतूनाशक फवारणी करण्यात आली आहे.

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!