कार्तिकी यात्रा, पंढरपूरमध्ये तीन दिवस मांस, मटण, मासे, मद्य विक्रीवर बंदी

पंढरपूर, दि. 06 – कार्तिकी एकादशीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात भाविक येतात पंढरपूर शहरातील सर्व  मांस, मटण, मासे, प्राणी कत्तल व मद्यविक्रीची दुकाने  गुरुवार दि. 7 ते  शनिवार दि. 9 नोव्हेंबर 2019 रोजी पर्यंत  बंद राहणार असल्याचे अपर जिल्हा दंडाधिकारी अजित देशमुख  यांनी आदेश  पारीत केले  आहेत.

            कार्तिकी एकादशीच्या पार्श्वभूमीवर  पंढरपुरात लाखो वारकरी येतात. वारीच्या कालावधीत कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी तसेच  कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी  फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम 144 अन्वये पंढरपूर शहरात हे  आदेश जारी केले आहेत.  हे आदेश दिनांक 07 ते 09 नोव्हेंबर 2019 पर्यंत जारी राहतील  असेही आदेशात अप्पर जिल्हा दंडाधिकारी अजित देशमुख  यांनी नमूद केले आहे.

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!