काळजी घ्या : जिल्हा ग्रामीणमध्ये बुधवारी कोरोना स्कोर पाचशेपार, चार तालुक्यात संख्या जास्त

पंढरपूर – कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचा प्रादुर्भाव कमी कमी होताना दिसत होता यामुळे निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. मात्र यामुळे आता सर्वत्र गर्दी वाढत असल्याने पुन्हा या संसर्गाचा प्रसार वाढतो की काय? अशी भीती निर्माण झाली आहे. बुधवारी 14 जुलै रोजी सोलापूर जिल्हा ग्रामीणमध्ये 516 रूग्णांची नोंद असून सर्वाधिक संख्या ही माळशिरस तालुक्यात 200 इतकी नोंदली गेली आहे.
यापाठोपाठ सांगोला 80, पंढरपूर 79 तर माढ्यात 72 अशा कोरोनाबाधितांची नव्याने भर पडली आहे. आजच्या अहवालानुसार चार जणांच्या मृत्यूची नोंद आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी शासन खूप प्रयत्न करत असून यास नागरिकांनी सहकार्य करणे आवश्यक आहे. पुन्हा वाढती कोरोना संख्या कडक निर्बंधांकडे नेवू शकते हे निश्‍चित आहे.
बुधवारच्या अहवालानुसार 9 हजार 404 चाचण्या झाल्या असून यापैकी 8 हजार 888 चाचण्या निगेटिव्ह आहेत तर 516 पॉझिटिव्ह आहेत. गेल्या काही दिवसांपासून माळशिरस तालुक्यातील संख्या वाढत चालली असून आज तेथे 200 रूग्ण एकाच दिवशी नोंदले गेले आहेत. या तालुक्यात कोरोनाबाधितांची एकूण संख्या आता पंचवीस हजार पार झाली आहे. येथे आजवर एकूण 25 हजार 724 रूग्ण आढळून आले आहेत. तर एकूण मृत्यू 386 नोंदले गेले आहेत. पंढरपूर तालुक्यापाठोपाठ रूग्णसंख्येत माळशिरसचा क्रमांक लागतो.
पंढरपूर तालुक्यात आज 79 रूग्णांची भर पडली असून शहरात 16 तर ग्रामीणचा आकडा 63 इतका आहे. येथील एकूण रूग्णसंख्या ही 26 हजार 774 इतकी झाली आहे. जी जिल्हा ग्रामीणमध्ये उच्चांकी असून कोरोनामुळे प्राण गमावणार्‍यांची येथील संख्या 516 इतकी आहे.
पंढरपूर शहरात आजवर एकूण 8 हजार 444 तर ग्रामीणमध्ये 18 हजार 330 रूग्ण आढळून आले आहेत. दुसर्‍या लाटेत ग्रामीण भागात वेगाने कोरोनाचा प्रसार झाला होता व अद्यापही तालुक्यात रूग्ण सापडत आहेत. यासाठी मोठ्या गावांमध्ये कोविड सेंटरर्स उभारण्यात आले होते. तर शहरातील हॉस्पिटलमध्ये कोरोनावर उपचार करण्याची परवानगी देण्यात आली होती. सध्या येथे शहरातील 41 तर ग्रामीणमधील 344 जणांवर उपचार सुरू आहेत.


माढा तालुक्यातही कोरोनाबाधितांची संख्या जास्त दिसत असून बुधवारच्या अहवालानुसार 72 रूग्ण सापडलेआहेत. यामुळे येथील एकूण संख्या 16 हजार 860 इतकी झाली आहे. या तालुक्यात आजवर कोरोनामुळे 346 जण दगावले आहेत. सांगोला तालुक्यात बुधवारी 80 कोरोना रूग्ण आढळले आहेत. यामुळे येथील एकूण संख्या 9 हजार 608 इतकी झाली आहे. कोरोनामुळे या तालुक्यात आजवर 109 जण मृत्यूमुखी पडले आहेत.

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!