काळजी घ्या : सोलापूर जिल्हा ग्रामीणमध्ये शुक्रवारी 314 कोरोना रूग्ण आढळले

पंढरपूर – शुक्रवारी 26 मार्च रोजी आलेल्या अहवालानुसार सोलापूर जिल्हा ग्रामीणमध्ये ( सोलापूर महापालिका क्षेत्र वगळून) 314 कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले आहेत. ही चिंताजनक बाब असून नागरिकांनी आता आणखी काळजी घेण्याची गरज आहे.
शुक्रवारच्या अहवालानुसार 5 हजा 693 चाचण्या करण्यात आल्या असून यापैकी 5 हजार379 चाचण्या निगेटिव्ह तर 314 पॉझिटिव्ह आहेत. आज 102 जणांनी कोरोनावर मात केली आहे. जिल्हा ग्रामीणमध्ये आतापर्यंत एकूण 43 हजार 918 कोरोनाबाधित आढळून आले असून या आजारात 1218 जणांनी प्राण गमावले आहेत तर 40 हजार 495 जणांनी या आजारावर मात केली आहे. सध्या 2205 जणांवर उपचार सुरू आहेत.
शुक्रवारी सर्वाधिक रूग्ण बार्शी तालुक्यात 104 आढळून आले असून यापाठोपाठ पंढरपूर तालुक्यात 48 ची नोंद आहे. माळशिरस 43, करमाळा 42 तर माढा तालुक्यात 34 रूग्णांची नोंद आहे.
जिल्ह्यात सर्वाधिक रूग्ण पंढरपूर तालुक्यात 8661 आढळून आले असून यापैकी 247 जणांच मृत्यू झाला आहे तर 8152 जणांनी कोरोनावर आजवर मात केली आहे. सध्या 262 जणांना उपचार सुरू आहेत. आज शहरात 13 तर ग्रामीणमध्ये 35 रुग्णांची नोंद आहे.
WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!