कै.बाबा कुसूरकर : एक झंझावात या विशेषकांचे शनिवारी सोलापूरमध्ये प्रकाशन

सोलापर – स्वातंत्र्यसेनानी तथा ज्येष्ठ समाजवादी नेते व सोलापूरच्या सर्वांगीण विकासासाठी अविश्रांत झटणारे कै. प्रभाकर उर्फ बाबा कुसूरकर यांच्या जन्मशताब्दीनिमित्त कै. बाबा कुसूरकर :एक झंझावात या विशेषांकाचे प्रकाशन दैनिक दिव्य मराठीचे राज्य संपादक श्री. संजय आवटे यांच्या हस्ते व माजी केंद्रीय गृहमंत्री श्री. सुशीलकुमार शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवार 30 जानेवारी रोजी सोलापूरमध्ये होत आहे.
कै.बाबा कुसूरकर यांचे हे जन्मशताब्दी वर्ष असून यानिमित्त त्यांचे कार्य तरूण पिढीला समजावे यासाठी विशेषांकाची निर्मिती करण्यात आली असून याचे मुख्य संपादक ज्येष्ठ समाजवादी नेते साथी पन्नालाल सुराणा हे आहेत. तर कार्यकारी संपादक म्हणून दत्ता गायकवाड व सचिव म्हणून संजीव कुसूरकर यांनी काम पाहिले आहे. या विशेषांकाचे प्रकाशन शनिवार 30 जानेवारी रोजी सायंकाळी पाच वाजता डॉ.निर्मलकुमार फडकुले सभागृहात प्रकाशन केले जाणार आहे. या कार्यक्रमात कोविड संदर्भात आरोग्यविषयक सर्व नियमांचे पालन करावे तसेच मास्क वापरावा असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!