कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता पंढरीतील सराफ दुकाने शुक्रवारपासून 31 जुलैपर्यंत बंद राहणार
पंढरपूर, दि. 22- कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता येथील सोने चांदीची सर्व दुकाने शुक्रवार 24 ते 31 जुलै दरम्यान बंद ठेवण्याचा निर्णय सराफ असोशिएशनच्या वतीने घेण्यात आला आहे.
याबाबत तातडीची बैठक बुधवारी संघटनेच्या वतीने बोलाविण्यात आली होती. या हा निर्णय घेण्यात आला आहे. पंढरपूर शहरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असून येथे रूग्ण संख्या वाढत आहे. यास्तव दुकानदार व काम करणार्या कर्मचार्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सर्व सराफ दुकाने शुक्रवार 24 ते 31 जुलै पर्यंत बंद ठेवली जाणार आहेत. असोशिएशनच्या सर्व सदस्यांनी आपली दुकाने बंद ठेवून सहकार्य करावे असे आवाहन असोशिएशनच्या वतीने अध्यक्ष महावीर गांधी व सचिव भगवंत बहिरट यांनी केले आहे. या कालावधी जर कोणी दुकान उघडे ठेवले तर असोशिएशनच्या वतीने कारवाई केली जाईल असे प्रसिध्दीपत्रकात नमूद करण्यात आले आहे.
शहरात कोरोनाचा प्रादुर्भावा वाढू लागल्याने येथील काही कापड दुकानदारांनी देखील आपली दुकाने बंद ठेवली आहेत. आता सराफ असोशिएशनने हा निर्णय घेतला आहे.