कोरोनाचा वाढता प्रभाव पाहता श्री विठ्ठल दर्शनाच्या ऑनलाइन बुकींग पासची संख्या १५०० पर्यंत घटविण्यात आली

पंढरपूर – कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव पाहता पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणीच मातेच्या दर्शनासाठी आता १७ मार्चपासून १५०० भाविकांना ऑनलाइन बुकींग करून मुखदर्शन घेता येणार आहेत .
याबाबत मंदिरे समितीची व्हिडीओ काँन्फरन्सिंगद्वारे बैठक बोलाविण्यात आली होती. यात आँनलाइन बुकींगव्दारे दर्शन पासची संख्या रोज तीन हजारावरून १५०० करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.१७ मार्च पासून याचा अंमलबजावणी होणार आहे. अशी माहिती कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी दिली.

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!