कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंढरीतील पत्रकारांना विम्याचे कवच
पंढरपूर,ता.22 – कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव वाढत असून अशा संकटाच्या काळात देखील आपला जीव धोक्यात घालून सामाजिक बांधिलकी म्हणून अनेक पत्रकार वार्तांकनाचे काम करत आहेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश सरचिटणीस दिलीप धोत्रे यांनी पंढरीतील पत्रकारांचा स्वखर्चाने दोन लाख रूपयांचा विमा उतरविला आहे.
अलीकडेच मुंबईतील काही पत्रकारांना कोरोनाची लागण झाली आहे. अशा संकट काळात पत्रकारांवर दुर्दैवी प्रसंग ओढवला तर त्यांना आर्थिक मदत मिळावी या सामाजिक भावनेपोट पंढरपूर शहर व तालुक्यातील 150 हून अधिक पत्रकारांना हे विमा कवच देण्यात आले असल्याचे दिलीप धोत्रे यांनी सांगितले. सरकारने पत्रकारांचा समावेश अत्यावश्यक सेवेमध्ये करुन त्यांचा प्रत्येकी 50 लाख रुपयांचा विमा उतरावा अशी मागणी ही त्यांनी यावेळी केली आहे.
अलीकडेच मनसेेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ही सरकारने पत्रकारांचा विमा काढून त्यांना संरक्षण द्यावे अशी मागणी केली आहे. या विम्याची एक वर्षाची मुदत असून तो दोन लाख रुपयांचा आहे. यामध्ये एखाद्या पत्रकाराचा मृत्यू झाल्यास 2 लाख 60 हजार रुपये, कायमस्वरुपी अपंगत्व आल्यास दोन लाख रुपये आणि अपघातात जखमी झाल्यास वैद्यकीय खर्चासाठी 25 हजार रुपये असा मिळू शकणार आहेत. दिलीप धोत्रे यांच्या हस्ते आज काही पत्रकारांना विमा पॉलिसीचे वितरण केले. यावेळी मनेसेेचे तालुका अध्यक्ष शशिकांत पाटील, शहाध्यक्ष सिध्देश्वर गरड, उपप्रमुख महेश पवार उपस्थित होते.