कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खासगी रुग्णालयांनी सेवा देणे बंधनकारक – प्रांताधिकारी सचिन ढोले

पंढरपूर -29- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खासगी रुग्णालयांनी कोरोनाबाधित रुग्णांच्या उपचारासाठी व अन्य रुग्णांच्या उपचारासाठी 80 टक्के खाटा राखीव ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. शासनाने काढलेल्या आदेशाचे खाजगी रुग्णालयांनी पालन करुन रुग्णांना वैद्यकीय सेवा द्याव्यात अशा सूचना प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी दिल्या आहेत.

राज्य शासनाच्या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी आपत्तीकालिन व्यवस्थापन कायदा व साथरोग नियंत्रण कायद्यामधील तरतुदीनुसार खासगी रुग्णालयांनी आदेशाचे पालन करणे बंधनकारक आहे. खासगी रुग्णालयांना कोरोना रुग्णांवरील उपचारासाठी शासन आदेशानुसार जे दर निश्चित करुन देण्यात आले आहेत. त्या प्रमाणेच आकारणी करावी लागणार आहे. प्रत्येक रुग्णांला उपचार मिळणे आवश्यक असून, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासकीय व खासगी रुग्णालय मिळून समन्वयाने काम करुन, कोरानावर मात करुया, असेही प्रांतधिकारी ढोले यांनी सांगितले.

प्रतिबंधित क्षेत्रामधील नागरिकांची प्राधान्याने आरोग्य तपासणी करण्यात येत असून, जेष्ठ नागरिकांची प्राधान्याने आरोग्य तपासणी करण्यात येत असल्याचेही प्रांताधिकारी ढोले यांनी सांगितले.

नियमांचे उल्लघंन करणाऱ्यावर कडक कारवाई-डॉ.कवडे

तालुक्यात शहरासोबतच ग्रामीण भागातही कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करणे गरजेचे आहे. कोरोनाची रुग्ण संख्या वाढू नये यासाठी नागरिकांनी प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे. अन्यथा नियमांचे उल्लंघन करणाऱ्यावर कडक कारवाई करण्यात येईल अशा इशारा उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.सागर कवडे यांनी दिला आहे.

तालुक्यात तसेच ग्रामीण भागात प्रतिबंधित केलेल्या क्षेत्रामध्ये निश्चित केलेल्या कालावधीत अत्यावश्यक सेवेव्यतिरिक्त कोणत्या नागरिकाला बाहेर जाता येणार नाही अथवा बाहेरील नागरिकाला आत येता येणार नाही. याबाबत प्रतिबंधित क्षेत्रात नियम कडक राबविण्यात येत आहे. खाजगी रुग्णालयांनी नागरिकांना आवश्यक आरोग्य सुविधा द्याव्यात जेणेकरुन अडचण निर्माण न होता प्रत्येक गरजू रुग्णाला तातडीने उपचार देणे सुलभ होईल, असेही डॉ.कवडे यांनी सांगितले.

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!