कोरोनाच्या पार्श्वभूमीवर माघ यात्रेतील जनावरांचा बाजार रद्द
पंढरपूर- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर माघ यात्रा कालावधीत पंढरपूरला भरणारा जनावरांचा बाजार रद्द करण्यात आला असल्याची माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने प्रसिध्दीपत्रकान्वये देण्यात आली आहे.
जनावरांचा बाजार या यात्रेचे आकर्षण असते मात्र येथे गर्दी होण्याची शक्यता पाहता हा बाजार या माघी वारीत भरणार नाही. तसेच येथे आजुबाजूच्या जिल्ह्यातून जनावरे विक्रीसाठी येतात त्यामुळे जनावरांमध्ये लंपी स्किन हा विषाणूजन्य त्वचा रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. हे पाहता 21 ते 25 फेब्रुवारी दरम्यान होणारा येथील माघ यात्रेतील जनावरांचा बाजार यंदा भरणार नाही. शेतकरी व पशुपालकांनी आपली जनावरे येथे विक्रीसाठी येथे आणू नयेत, असे आवाहन सभापती दिलीप घाडगे व उपसभापती विवेक कचरे यांनी केले आहे.
फोटो संग्राह्य