कोरोनाच्या पार्श्वभूमीवर माघ यात्रेत २३ फेब्रुवारीला पंढरपूरसह दहा गावात संचारबंदी, दशमी- एकादशीला दर्शन बंद तर दिंड्यांना पंढरीकडे प्रस्थान ठेवण्यास मनाई
पंढरपूर – कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर माघ एकादशी २३ फेब्रुवारी रोजी पंढरपूर शहर व आजुबाजूच्या दहा गावात संचारबंदी असणार आहे. ( २२फेब्रुवारी रात्रौ १२ ते २३ फेब्रुवारी रात्रौ १२ पर्यंत ) याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी जारी केले आहेत. कोरोनाची स्थिती पाहता दशमी २२ फेब्रुवारी व एकादशी २३ फेब्रुवारीला श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद असणार आहे.
दशमी व एकादशीला रेल्वे, एसटी बसेस व खासगी वाहतूक पूर्णतः बंद न ठेवता सामान्य प्रवासी व अत्यावश्यक सेवेसाठी नियंत्रित स्वरूपात सुरू राहिल. सामान्य प्रवाशी मंदिरापासून दूर अंतरावर उतरतील याची दक्षता घेण्याचे आदेश आहेत.
२३ फेब्रुवारीला संपूर्ण पंढरपूर शहरासह चिंचोली भोसे, शेगाव दुमाला, लक्ष्मी टाकळी, गोपाळपूर, वाखरी, गादेगाव, कौठाळी, शिरढोण , भटुंबरे, कोर्टी गावात संचारबंदी असणार आहे.
माघ यात्रेत पंढरपूरला २५० हून अधिक टाकून पायी दिंड्या येतात मात्र कोरोनामुळे त्यांना पंढरपूरमध्ये येण्यास मनाई करण्यात आली आहे.
सविस्तर माहिती