कोरोनाच्या महामारीवर मात करण्यासाठी “योग साधना” हेच सर्वात मोठे औषध

महिला केंद्रीय प्रभारी सुधा अळ्ळीमोरे यांचे प्रतिपादन
===================
सोलापुरात पतंजली योग समितीच्यावतीने जागतिक योगदिन साजरा
==================
सोलापूर – (प्रतिनिधी ) – कोरोनाच्या महामारीवर मात करण्यासाठी योग साधना हेच सर्वात मोठे औषध आहे. योग आणि प्राणायाम निरोगी आरोग्याचा मूलमंत्र आहे. या मूलमंत्राचा अंगीकार करून प्रत्येक व्यक्तीने आपल्या सार्वजनिक जीवनात वाटचाल केल्यास देश निरोगी आणि सशक्त बनेल, असे प्रतिपादन पतंजली योग पिठाच्या महिला केंद्रीय प्रभारी सुधा अळ्ळीमोरे यांनी केले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोलापूर पतंजली योग समितीच्यावतीने रविवारी सकाळी वसंत विहार येथील पंधे उद्यानात जागतिक योगदिन साजरा करण्यात येणार आला. यावेळी साधकांना मार्गदर्शन करताना सुधा अळ्ळीमोरे बोलत होत्या .
पुढे बोलताना सुधा अळ्ळीमोरे म्हणाल्या,नियमित योग आणि प्राणायाम केल्यास मानसिक आणि शारिरीक स्वास्थ लाभते. योगामुळे मन आणि शरीर सदृढ होण्यास मदत होते. नियमित योग केल्याने तणाव दूर होण्याबरोबरच शरीरातील व्याधींपासून सुटका मिळते.मानवाच्या शारीरिक, मानसिक, बौद्धिक विकासाबरोबर अध्यात्मिक उन्नतीची परिसीमा योग साधनेतुन साधता येते. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर २०१४ मध्ये संयुक्त राष्ट्राच्या महासभेत २१ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा करण्याचा प्रस्तावाला मांडला आणि डिसेंबरमध्ये त्याला मान्यता मिळाली. २१ जून २०१५ रोजी पहिला आंतरराष्ट्रीय योग दिवस जगभरात उत्साहाने साजरा करण्यात येतो. यानिमित्ताने योगाला घराघरात पोचवण्याचे योगगुरू स्वामी रामदेवजी महाराज यांचे स्वप्न पूर्ण झाले आहे.
भारतीय संस्कृतीतील योगाचे महत्त्व अधोरेखित होण्याचे प्रयत्न या दिना निमित्ताने होत आहे.यावर्षी योग दिवस कोरोनामुळे सामुहिकपणे साजरा करता आला नाही. म्हणून हा योग उत्सव पतंजली योग समिती व वेगवेगळ्या योग संघटनेच्या माध्यमातून घरीच साजरा करण्यात आला. रविवारी सकाळी ७ ते ८ या वेळेत पतंजली योग समिती महाराष्ट्रद्वारा प्रत्येक जिल्ह्यातून फेसबुक लाईव्ह द्वारा हा कार्यक्रम सादर करण्यात आला . आयुष मंत्रालयाच्यावतीने स्वामी रामदेव महाराजांच्या सानिध्यात हरिद्वारवरून हा कार्यक्रम प्रसारित आला,असे अळ्ळीमोरे यांनी सांगितले.
यावेळी अविनाश अळ्ळीमोरे,प्रकाश जाधव,संजय अर्धापुरे,निर्मला कामत,भारती अळ्ळीमोरे, प्रीती अळ्ळीमोरे,अनिता जाधव आदी उपस्थित होते.

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!