कोरोनामुळे पंढरीची चैत्री यात्रा रद्द , विठ्ठल मंदिराकडून 1 कोटी ₹ सहायता निधी
पंढरपूर – कोरोना विषाणूचा वाढता प्रादूर्भाव पाहता पंढरपूरची चैत्र यात्रा रद्द करण्यात आली आहे. दरम्यान कोरोना प्रतिबंधक उपाय योजनांसाठी श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समितीने १ कोटी ₹ मुख्यमंत्री सहायता निधीस देवू केले आहेत. आता मंदिर १४ एप्रिल पर्यंत बंद राहणार आहे.
कोरोनाचा प्रभाव पाहता १७ ते ३१ मार्च दरम्यान विठ्ठल मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभर १४ एप्रिल २०२० पर्यंत लाँकडाऊन जाहीर केला आहे. यामुळे पंढरपूरचे मंदिर १४ पर्यंत बंद राहणार आहे. ४ एप्रिल रोजी चैत्री एकादशी असली तरी यंदा पंढरीत कोरोनामुळे यात्रा भरणार नाही. कोणाही भाविकाने पंढरपूरला येवू नये. असे आवाहन करण्यात आले आहे. यापूर्वी वारकरी महाराज मंडळींनी ही चैत्री यात्रेसाठी वारकऱ्यांनी पंढरीत येवू नये असे जाहीर आवाहन केले आहे.
दरम्यान मंदिर समितीने कोरोना प्रतिबंधक उपायांसाठी मुख्यमंत्री सहायता निधीस १ कोटी रूपये देवू केले आहेत. कयाचबरोबर पंढरीत आरोग्यसेवेसाठी मेडिकल कीटचे सहकार्य मंदिर करत आहे. याचबरोबर निराधार व्यक्तिंना भोजन पाकिटे मंदिर समिती पुरवित आहे.