कोरोनाविरोधी पंढरपूर पॅटर्न म्हणजे टीम वर्क होय : डॉ. सागर कवडे

पंढरपूर कोरोना विरोधी लढाईतील आजवर यशस्वी झालेला पंढरपूर पॅटर्न वेगळे काही नसून टीम वर्क असल्याचे प्रतिपादन उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सागर कवडे यांनी व्यक्त केले.येथील श्रमिक पत्रकार संघाच्यावतीने पंढरपूर शहर कोरोनमुक्त ठेवण्यात यश मिळवले आणि कोरोनावर नियंत्रण राखण्यासाठी प्रयत्न केल्याबद्दल प्रशासकीय अधिकाऱ्यांचा कोविड योद्धा म्हणून सन्मान केला. त्याचबरोबर दोन दिवसांपूर्वी जाहीर झालेल्या राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उपजिल्हाधिकारी म्हणून निवड झालेल्या अनुपसिंह यादव आणि उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून निवड झालेल्या सौ. गीता टकले यांचाही श्रमिक पत्रकार संघाच्यावतीने सत्कार करण्यात आला. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. कवडे, तालुका आरोग्याधिकारी डॉ. एकनाथ बोधले, नगरपालिकेचे उपमुख्याधिकारी सुनील वाळूजकर मनसेचे सहकार आघाडीचे प्रदेशाध्यक्ष दिलीप धोत्रे होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ पत्रकार सिद्धार्थ ढवळे हे होते.
कोरोना विरोधी लढाईतील आजवर यशस्वी झालेला पंढरपूर पॅटर्न वेगळे काही नसून टीम वर्क असल्याचे प्रतिपादन उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सागर कवडे यांनी व्यक्त केले.येथील श्रमिक पत्रकार संघाच्यावतीने पंढरपूर शहर कोरोनमुक्त ठेवण्यात यश मिळवले आणि कोरोनावर नियंत्रण राखण्यासाठी प्रयत्न केल्याबद्दल प्रशासकीय अधिकाऱ्यांचा कोविड योद्धा म्हणून सन्मान केला. त्याचबरोबर दोन दिवसांपूर्वी जाहीर झालेल्या राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उपजिल्हाधिकारी म्हणून निवड झालेल्या अनुपसिंह यादव आणि उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून निवड झालेल्या सौ. गीता टकले यांचाही श्रमिक पत्रकार संघाच्यावतीने सत्कार करण्यात आला. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. कवडे, तालुका आरोग्याधिकारी डॉ. एकनाथ बोधले, नगरपालिकेचे उपमुख्याधिकारी सुनील वाळूजकर मनसेचे सहकार आघाडीचे प्रदेशाध्यक्ष दिलीप धोत्रे होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ पत्रकार सिद्धार्थ ढवळे हे होते.
यावेळी पुढे बोलताना डॉ. कवडे म्हणाले कि, प्रांताधिकारी सचिन ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपालिका, आरोग्य विभाग, शहरातील समाजीक संघटना, सर्व पत्रकार यांचे एकत्रित प्रयन्त आहेत. त्याचबरोबर पंढरपूरच्या नागरिकानीहि मोठे सहकार्य केले म्हणून अद्याप पर्यंत शहर य तालुका कोरोनानियंत्रित आहे. मात्र हि लढाई अजूनही संपलेली नाही त्यामुळे पुढच्या काळात अधिक सावधपणे काम करावे लागेल.
यावेळी डॉ. बोधले म्हणाले कि, सर्व विभागांनी समानव्याने कामे केली, एरव्ही प्रत्येक विभागाची आपापली कार्यक्षेत्रे वेगळी असतात त्यामुळे कोणी कोणाच्या कामात डोकावत नाही , हस्तक्षेप केला जात नाही , मात्र कोरोनामुळे सर्वच विभाग एकत्रित येऊन काम करू लागले. बाहेरून आलेल्या लोकांवर लक्ष ठेऊन त्यांना कोरंटाईन करण्यात आले. सर्व अधिकाऱ्यांनी, कर्मचाऱ्यांनी दिवसरात्र काम केले, पत्रकारांनी मोठे सहकार्य केले म्हणून आजवर तरी कोरोनमुक्त आहोत. पत्रकारांनी केलेला सन्मान जबाबदारी वाढवणारा असल्याचेही डॉ. बोधले म्हणाले.
यावेळी उपमुख्याधिकारी सुनील वाळूजकर, दिलीप धोत्रे, नूतन अधिकारी यादव आणि टकले यांनीही मनोगत व्यक्त केले. स्वागत शिवाजी शिंदे यांनी केले, प्रास्ताविक संघाचे अध्यक्ष सूर्यकांत बनकर यांनी केले. सूत्रसंचालन सुधाकर कवडे, आभार प्रदर्शन सुनील उंबरे यांनी मानले. यावेळी मास्क लावून, सोशल डिस्टंसिंग पाळून सर्व पत्रकार उपस्थित होते . कार्यक्रमस्थळी हात स्वच्छतेसाठी सँनिटायझरची सोय करण्यात आली होती.
WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!