कोरोनाशी लढ्यासाठी तरूणाई सरसावली, ओंकार जोशींकडून व्हिटामिन गोळ्या व मेडिकल किट
पंढरपूर – कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर नागरिकांची रोगप्रतिकारक शक्ती वाढली पाहिजे. या हेतूने ओंकार जोशी मित्र परिवाराच्या वतीने व्हिटामिन-सी गोळ्यांचे आणि मेडिकल किटचे अडीचशेहून अधिक घरांमध्ये वाटप करण्यात आले.
कोरोना व्हायरस या आजाराच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र खबरदारीचे उपाय म्हणून प्रत्येक व्यक्ती प्रयत्न करीत आहे. सर्व लोक घरातच आहेत. मात्र अत्यावश्यक सेवेसाठी काहीजण अजूनही घराबाहेर पडतात. कोरोना आजार व इतर आजारांशी सामना करण्यासाठी मानवामध्ये सर्वात महत्त्वाची रोगप्रतिकारक शक्ती असावी लागते. या हेतूने घोंगडे गल्ली, भजनदास चौक ,मेंढे गल्ली, हरिदास वेस परिसर आदी भागांमध्ये व्हिटामिन-सी च्या गोळ्या तसेच हात धुण्यासाठी डेटॉल साबण आणि कफसिरप या वस्तूंचे नुकतेच ओंकार जोशी यांच्या वतीने वाटण्यात आले. विशेष म्हणजे सदरच्या व्हिटामिन-सी आणि कपसिरपच्या गोळ्या या डॉक्टरांच्या सल्ला घेऊनच देण्यात आल्या आहेत.
सदरच्या मेडिकल किटचे वाटप हे नागरिकांना घरपोच देण्यात आले. तसेच रोगप्रतिकारक शक्ती वाढावी आणि आरोग्य चांगले राखावे. यासाठी मार्गदर्शक तत्त्वे असणारे पत्रक देखील यावेळी वितरित करण्यात आले. या पत्रकांच्या माध्यमातून लोकाना घरी राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सदर किट वाटप करीत असताना हँड सॅनिटायझरने हात स्वच्छ करुनच ते नागरिकांकडे सुपूर्द केले जात होते.
सदरचे वाटप करण्यासाठी वेगवेगळ्या परिसरामध्ये तरुण मंडळी एकट्याने फिरत हातेती.यामध्ये या सर्वाना राजू उराडे यांचे मार्गदर्शन लाभले. यामध्ये ओंकार जोशी मित्र परिवारातील प्रथमेश सासवडे कुणाल आणि करण हेळेकर , महेश आणि गणेश डोईफोडे , कैलास नवले , बाळासाहेब सादिकले ,निखिल सादिकले, ऋषिकेश सादिगले , मोहित शहा , सूरज मिसाळ , अभिषेक कोल्लर यांनी या किटचे वाटप केले.