खर्डीत 157 रॅपिड टेस्ट, 10 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले
अमोल कुलकर्णी
खर्डी:- पंढरपूर तालुक्यातील खर्डी येथील सिताराम महाराजांच्या मठामध्ये प्राथमिक आरोग्य उपकेंद्र खर्डी मार्फत कोरोना तपासणी करण्यात आली.यामध्ये 157 सहभागी ग्रामस्थापैकी 10 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले असल्याची प्राथमिक माहिती वैद्यकीय अधिकारी विलास जाधव यांनी दिली.
वैद्यकीय तपासणी वेळी तंत्रज्ञ डॉक्टर प्रसाद कुलकर्णी,शिवाजी कांबळे,संजय मोरे,महेश जेठे,मोहन यादव,पिंटू क्षीरसागर, लक्ष्मण साबळे,अजित अभंगराव, सुनीता शिंदे ,समाधान लोहार, अण्णा पवार यांच्या सह आशा स्वयंसेविका उपस्थित होते.रॅपिड तपासणीत खर्डी येथील चार रुग्ण तर तपकिरी शेटफळ येथील सहा रुग्ण पॉझिटिव्ह आढळले. बोहाळी सह उंबरगाव ग्रामस्थांनी सहभाग नोंदविला. दोन जणांची फेरतपासणी करण्यात आली.
पाँझिटिव्ह आढळलेल्या दहा रुग्णांना वाखरी येथील कोविड सेंटरमध्ये हलवण्यात आले आहे. येथील स्थानिक व्यापारी, किराणा दुकानदार, तसेच हॉटेल चालकांची तपासणी करण्यात आली.खर्डी चे सरपंच रमेश हाके ग्रामपंचायत सदस्य सिताराम रोंगे,संभाजी चव्हाण,अनिल कांबळे,सह बंडू रणदिवे,बालाजी रोंगे यांचे सहकार्य लाभले.