गुरूवारच्या अहवालानुसार सोलापूर ग्रामीणमध्ये 557 रूग्ण वाढले, माळशिरस तालुक्यात 108 ची भर
सोलापूर– सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात (महापालिकाकाक्षेत्र वगळून) गुरूवारी 17 सप्टेंबर रोजी एकूण 557 कोरोना रुग्ण वाढले आहेत. सर्वाधिक कोरोनाबाधित माळशिरस तालुक्यात 108 आढळले आहेत. दरम्यान ग्रामीण भागात आज 346 जणांनी कोरोनावर मात केली आहे. गुरुवारी जिल्हा ग्रामीणमध्ये 12 जणांनी कोरोनामुळे प्राण गमावले आहेत.कोरोनाचा प्रसार वेगाने होत असला तरी या आजारावर मात करून घरी परतणार्यांची संख्या ही दिवसेंदिवस वाढत आहे. दरम्यान ग्रामीण भागात कोरोनाबाधितांची एकूण संख्या 19305 इतकी झाली असून यापैकी 12184 जण कोरोनावर मात करून घरी गेले आहेत तर 6578 जणांवर उपचार सुरू आहेत. आज 346 जणांना घरी पाठविण्यात आले आहे. आजवर 543 जणांनी या आजारात प्राण गमावले आहेत.आजच्या अहवालानुसार 12 जण मयत आहेत.
पंढरपूर तालुका: 79 कोरोना रुग्ण वाढले
पंढरपूर – गुरूवारी 17 सप्टेंबर रोजी आलेल्या जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या अहवालानुसार पंढरपूर शहर 25 व तालुक्यात 54 असे 79 कोरोनाबाधित रूग्ण वाढले आहेत.पंढरपूर शहर व तालुक्यात एकूण कोरोनाबाधितांची संख्या 3 हजार 945झाली आहे. आजच्या अहवालानुसार 1 जण मरण पावले आहेत. आजवर कोरोनामुळे प्राण गमावल्यांची एकूण संख्या 91 आहे.एकूण 1090 रूग्णांवर उपचार सुरू असून,आजवर 2764 जण कोरोना मधून बरे झाले आहेत .