ग्रामीण डाक सेवक व विमा प्रतिनिधी पदांसाठी अर्ज करण्याचे आवाहन
पंढरपूर -पंढरपूर विभागात ग्रामीण भाग सेवकाच्या विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. तरी इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज सादर करावेत असे आवाहन डाकघर विभागाचे अधीक्षक एन. रमेश यांनी केले आहे.
चीफ पोस्ट मास्टर जनरल महाराष्ट्र सर्कल मुंबई यांच्या सुचनेनुसार पंढरपूर विभागात ग्रामीण डाक सेवकाच्या विविध जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज https://indiapost.gov.in व https://appost..in/gdsonline या संकेत स्थळावर दिनांक 30 नोव्हेंबर 2019 पर्यंत सादर करावेत.
अर्ज सादर करणाऱ्या उमेदवाराचे वय दिनांक 1 नोव्हेंबर 2019 रोजी सर्वसाधारण प्रवर्गासाठी (OC) वय 18 ते 40, इतर मागासवर्गीयांसाठी (OBC) वय 18 ते 43, तसेच अनुसूचित जाती व जमातीसाठी (SC/ST) वय 18 ते 45 वर्षापर्यंत असावे. या पदासाठी उमेदवाराची शैक्षणिक पात्रता दहावी पास असून, उमेदवारास संगणकाची माहिती असावी तसेच उमेदवाराने कमीत कमी 60 दिवसाचे प्रशिक्षण घेतलेले प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी https://indiapost.gov.in या संकेत स्थळावर भेट द्यावी असे आवाहनही पंढरपूर डाक घर विभागाचे अधीक्षक एन. रमेश यांनी केले आहे
पोस्ट विभागात विमा प्रतिनिधी साठी अर्ज करण्याचे आवाहन
पंढरपूर :- टपाल जीवन विमा व ग्रामीण टपाल जीवन विमा प्रतिनिधीची नेमणूक अधीक्षक डाक घर पंढरपूर यांच्यामार्फत थेट मुलाखतीद्वारे केली जाणार आहे. तरी इच्छुक विमा एजंट साठी उमेदवारांनी अर्ज करावेत असे आवाहन डाकघर विभागाचे अधीक्षक एन रमेश यांनी केली आहे
टपाल जीवन विमा व ग्रामीण टपाल जीवन विमा एजंट ची नेमणूक करण्यासाठी उमेदवारांनी आपले अर्ज रजिस्टर अथवा स्पीड पोस्टाने विहित नमुन्यात भरून सादर करावेत. अर्जावरती डाक जीवन विमा अथवा ग्रामीण विमा एजंट साठी अर्ज असे लिहून अधीक्षक डाक घर पंढरपूर विभाग पंढरपूर यांच्या नावे दिनांक 26 नोव्हेंबर 2019 रोजी सकाळी 10.00 ते दुपारी 3.00 वाजेपर्यंत पाठवावेत
अर्ज केलेल्या उमेदवारांची थेट मुलाखत दिनांक 28 नोव्हेंबर 2019 रोजी सकाळी 10.00 ते दुपारी 3.00 वाजेपर्यंत होणार असून, उमेदवारांनी अधीक्षक डाक घर पंढरपूर येथे स्वखर्चाने उपस्थित राहावे तसेच नमुना अर्ज व अधिक माहितीसाठी पंढरपूर विभागातील सर्व पोस्ट कार्यालयात संपर्क साधावा असे आवाहनही डाकघर विभागाचे अधीक्षक एन रमेश यांनी केली आहे