चंद्रभागा वाळवंटातील वाळूचोरीचे खड्डे बुजविण्याची मोहीम

पंढरपूर, – शहरासह तालुक्यात नदीकाठी वाळू चोरीचे प्रमाण सध्या भरमसाठ वाढले आहे. येथील चंद्रभागेच्या वाळवंटाला ही वाळू चोरांनी पोखरायला सुरुवात केल्याने भक्त पुंडलिकासह व अन्य लहान मंदिर व समाध्यांना धोका निर्माण झाला आहे. हे पाहता बांधकाम सभापती विक्रम शिरसट यांनी नगरपरिषदेच्या सहाय्याने हे खड्डे बुजविण्याची मोहीम हाती घेतली आहे.
पंढरीतील नदीकाठ आणि वाळूचोरी हा नेहमीचा चर्चेचा विषय बनला आहे. येथे मोठ्या प्रमाणात वाळू चोरी होत असून रात्री गाढवांवर पोती ठेवून नेली जातात. याचा परिणाम वाळवंटातील मंदिर व संतांच्या समाध्यांना धोका निर्माण झाला आहे. या मंदिर व समाध्यांच्या आजुबाजूची वाळू काढून नेण्यर्चीं आली आहे. नगरसेवक विक्रम शिरसट यांनी हे खड्डे बुजविण्याची मोहीम आता हाती घेतली आहे. यासाठी सतीश नेहतराव, मारुती संगीतराव,प्रकाश बुवा अभंगराव,सोनू आधटराव,महादेव अभंगराव,माउली आधटराव,आनंद माने यांच्यासह होडी माल चालक मालक संघटना व कोळी समाजातील युवकांनी त्यांना पाठिंबा दिला आहे.

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!