चिंताजनक : गुरुवारी सोलापूर जिल्ह्यात 516 कोरोना रुग्ण वाढले, 4 जणांचा मृत्यू

पंढरपूर – गुरुवारी 25 मार्च रोजी सोलापूर शहरात 217 व ग्रामीण भागात 299 असे एकूण 516 कोरोनाबाधित रूग्ण वाढले असून जिल्ह्यात 4 जणांचा मृत्यू झाला आहे.
गुरूवारी सोलापूर शहरात 217 रुग्ण आढळले आहेत. आजच्या अहवालानुसार 1062 कोरोना चाचण्या झाल्या असून 845 निगेटिव्ह तर 217 पॉझिटिव्ह आहेत. शहरात आजवर 14703 कोरोना रुग्ण आढळून आले आहेत . यापैकी 697 जणांचा मृत्यू झाला आहे. 12280 जणांनी कोरोनावर मात केली असून सध्या 1726 जणांवर उपचार सुरु आहेत.
जिल्हा ग्रामीणमध्ये गुरुवारी 299 रुग्ण आढळले असून सर्वाधिक रूग्ण बार्शी तालुक्यात 85, करमाळा 47 , माळशिरस 45, तर पंढरपूर तालुक्यात 33 आढळून आले आहेत. आजच्या अहवालानुसार 4367 चाचण्या झाल्या असून यापैकी 4068 निगेटिव्ह तर 299 पॉझिटिव्ह आहेत. आज 67 जणांना उपचारानंतर घरी पाठविण्यात आले आहे. गुरुवारच्या अहवालानुसार 2 जण कोरोनामुळे मयत आहेत.
जिल्हा ग्रामीणमध्ये आजवर 43 हजार 604 कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले असून 1218 जणांनी या आजारात प्राण गमावले आहेत. 40 हजार 393 जणांनी कोरोनावर मात केली असून 1993 जणांवर सध्या उपचार सुरू आहेत.
जिल्हा ग्रामीणमध्ये सर्वाधिक रूग्ण पंढरपूर तालुक्यात 8613 आढळून आले असून 247 जणांनी या आजारात प्राण गमावले आहेत तर 8125 जणांनी कोेरोनावर मात केली आहे. सध्या 241 जणांवर उपचार सुरू आहेत. आज शहरात 17 तर ग्रामीणमध्ये 16 कोरोनाबधित आढळून आले आहेत.

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!