चिंताजनक : गुरुवारी सोलापूर जिल्ह्यात 311 कोरोना रुग्ण वाढले

पंढरपूर- सोलापूर जिल्ह्यात गुरुवारी 311 कोरोनाबाधित रूग्णांची वाढ झाली असून सोलापूर शहरात 121 तर जिल्हा ग्रामीण भागात 190 जणांची आज नोंद आहे. दरम्यान ग्रामीणमध्ये 1 तर सोलापूर शहरात 4 रूग्णांनी या आजारात प्राण गमावले आहेत.
दरम्यान जिल्हा ग्रामीणमध्ये आज सर्वाधिक रूग्ण बार्शी तालुक्यात 96 आढळले असून यापाठोपाठ माळशिरस 25, तर करमाळा 24 व माढा तालुक्यात 14 रुग्णांची नोंद आहे. आजवर ग्रामीणमध्ये 42 हजार 140 रूग्ण नोंदले गेले असून यापेकी 1204 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे तर 39 हजार 839 जणांनी या आजारावर मात केली आहे. सध्या 1097 जणांवर उपचार सुरू आहेत.
पंढरपूर तालुक्यात आजवर एकूण 8 हजार 428 रूग्ण आढळून आले असून 244 जणांनी या तालुक्यात कोरोनामुळे प्राण गमावले आहेत. सध्या 168 जणांवर उपचार सुरू असून 8 हजार 016 जणांनी या तालुक्यात कोरोनावर मात केली आहे. आज पंढरपूर तालुक्यात 8 कोरोनाबाधितांची नोंद आहे.
*18 मार्च 2021*
कोरोना रिपोर्ट
*ग्रामीण*
अहवाल – 3010 ,
*पॉझिटिव्ह – 190*
बरे झाले – 97 ,
मृत – 1,
ऍक्टिव्ह – 1097
*सोलापूर शहर
अहवाल – 1166,
*पॉझिटिव्ह – 121*
बरे झाले – 88,
मृत – 4,
ऍक्टिव्ह – 876

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!