पंढरपूर – रविवार 4 एप्रिल 2021 रोजी आलेल्या अहवालानुसार सोलापूर जिल्हा ग्रामीणमध्ये (सोलापूर महापालिकाक्षेत्र वगळून) 562 कोरोनाबाधित रूग्णांची वाढ झाली असून 5 जणांचा मृत्यू झाला आहे.
रविवारी जिल्हा ग्रामीणमध्ये सर्वाधिक रूग्ण बार्शी तालुक्यात 167 तर यापाठोपाण माळशिरस तालुक्यात 99, पंढरपूर 65, माढा तालुका 64 अशी नोंद आहे. आजच्या अहवालानुसार जे 5 मृत्यू नोंदले गेले आहेत. यात अक्कलकोट, बार्शी, माढा माळशिरस व पंढरपूर तालुक्यात प्रत्येकी एका मृत्यूची नोंद आहे. दिवसात एकूण 6 हजार 104 चाचण्या झाल्या असून यापैकी 5542 निगेटिव्ह आहेत तर 562 पॉझिटिव्ह आहेत. 340 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे.
आजवर जिल्हा ग्रामीणमध्ये 47 हजार 542 कोरोना रूग्ण आढळून आले असून यापैकी 1252 जणांचा या आजारात मृत्यू झाला आहे तर 42 हजार 081 जणांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या 3 हजार 869 जणांवर उपचार सुरू आहेत.
सर्वाधिक रूग्ण पंढरपूर तालुक्यात 9 हजार 109 इतके आढळून आले असून यापैकी 251 जणांचा मृत्यू झाला आहे तर 8 हजार 367 जणांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या 491 जणांवर उपचार सुरू आहेत. रविवारी पंढरपूर शहरात 29 तर ग्रामीणमध्ये 36 कोरोना रूग्णांची नोंद आहे.