जनता कर्फ्यूला पंढरपूर शहर व तालुक्यात मोठा प्रतिसाद
पंढरपूर,दि.22- कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंढरपूर नगरपरिषद पुकारलेल्या तीन दिवसीय जनता कर्फ्यूला आज पहिल्या दिवशी मोठा प्रतिसाद मिळाला. शहरातील सर्व रस्त्यांवर नीरव शांतता होती. तालुक्यातील अनेक गावांनी देखील कडकडीत बंद पाळला आहे.
सोलापूर शहरात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढल्यानंतर जिल्ह्यात सर्वत्र आता जास्त खबरदारी बाळगली जात आहे. अनेक तालुक्यात संचारबंदीचे काटेकोरपणे पालन होत आहे. दवाखाने व औषधाची दुकाने वगळता किराणा, भाजीपाला विक्री तीन दिवसांसाठी बंद ठेवण्यात आली आहे. केवळ सकाळी सात ते नऊ वाजेपर्यंतच दूध विक्री करण्यास परवानगी देण्यात आली आहे. प्रांताधिकारी सचिन ढोले, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.सागर कवडे, तहसीलदार वैशाली वाघमारे, गटविकास अधिकारी रवीकिरण घोडके यांनी तालुक्यातील प्रत्येक गावात जावून कोरोनाबाबत जनजागृती केली आहे. यामुळे पंढरपूर शहराबरोबरच बरोबरच खर्डी, सरकोली, देगाव, भंडीशेगाव, शेवते, गार्डी, आढीव, शेटफळ, उपरी, भाळवणी, खेडभोसे, आंबे, उंबरे, पांढरेवाडी, मेंढापूर, गोपाळपूर, लक्ष्मी टाकळी, खरातवाडी, गादेगाव, पळशी, बोहाळी यांच्यासह अनेक गावे कडकडीत बंद होती. यापैकी अनेक गावे शहराप्रमाणेच तीन दिवस बंद राहणार आहेत. तर काही गावांनी दोन दिवस जनता कर्फ्यू पाळण्याच निर्णय घेतला आहे..