जिजामाता प्रशालेचा निकाल १०० टक्के; २३९ पैकी ७७ मुलींना ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण
अकलुज, – पुणे बोर्डाकडून घेण्यात आलेल्या दहावीच्या परिक्षेत अकलूज येथील शिक्षण प्रसारक मंडळ संचलित जिजामाता कन्या प्रशालेतील ७७ मुलींनी ९० टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवले आहेत. २३९ पैकी २३९ मुली उत्तीर्ण होऊन शाळेचा निकाल १०० टक्के लागला आहे. प्रशालेमध्ये ९९.२० टक्के गुण मिळवत कु. किरण कालिदास मगर व कु. प्रणिता मोहन मिटकल यादोघींनी प्रथम क्रमांक मिळवला आहे.
प्रशालेमध्ये प्रीती दिलीप कागदे ९८.८० (द्वितीय), देविका हरिश्चंद्र मगर व सेजल प्रमोद मेटे, आलिशा सिकंदर शेख या तीन जणींनी ९८.४० टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक मिळवला आहे. प्रशालेतील २३९ पैकी ७७ मुलींनी ९० टक्केंपेक्षा जास्त तर १४४ मुलींनी ८० टक्केंपेक्षा जास्त गुण मिळाले असल्याची माहिती मुख्याध्यापिका मंजुश्री दीपक जैन यांनी दिली. प्रशालेतील यशस्वी मुलींचे अभिनंतन संस्थेचे अध्यक्ष जयसिंह मोहिते-पाटील, सभापती सुलक्षणादेवी मोहिते-पाटील, संचालिका कु. स्वरूपाराणी मोहिते-पाटील, सचिव अभिजित रणवरे, सहसचिव हर्षवर्धन खराडे यांनी केले.