सोलापूर- जिल्ह्याच्या ग्रामीण भागात आढळून आलेल्या कोरोनाबाधितांची एकूण संख्या सोमवारी २०४ झाली असून आज ८ नवे रूग्ण आढळून आले आहेत. यात अक्कलकोट तालुक्यातील ७ तर एक करमाळा तालुक्यातील झरे येथील आहे.
आज ग्रामीण भागातील ( सोलापूर महापालिका क्षेत्र वगळून) १०७ जणांचे स्वॅब तपासणी अहवाल प्राप्त झाले असून यापैकी ८ पॉझिटिव्ह आहेत तर ९९ निगेटिव्ह आले आहेत. आता जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ही २०४ झाली आहे. (यात एक रूग्ण पुण्यात पॉझिटिव्ह आढळला आहे). कोरोनामुळे जिल्ह्यात ११ जणांना आपले प्राण गमवावे लागले असून आतापर्यंत उपचार घेवून ८७ जण घरी परतले आहेत. १०६ जणांवर उपचार सुरू आहेत.
दरम्यान आज करमाळा तालुक्यातील झरे येथे १ रुग्ण आढळून आला आहे. ही व्यक्ती ठाणे येथून आली आहे.
तालुका निहाय एकूण कोरोनाबाधितांची संख्याः अक्कलकोट ३७, बार्शी ३०, करमाळा १, माढा ७, माळशिरस ५, मोहोळ १०, उत्तर सोलापूर १३,पंढरपूर ७, सांगोला ३, दक्षिण सोलापूर ९१.
उपचार घेवून घरी परतलेले रुग्ण. अक्कलकोट ८, बार्शी १८, करमाळा ०, माढा ७, माळशिरस २, मोहोळ ३, उत्तर सोलापूर ८,पंढरपूर ७, सांगोला २, दक्षिण सोलापूर ३९.