जुळी भावंड अजय- विजय भारतीय सैन्यदलात भरती
पंढरपूर तालुक्यातील तारापूर येथील अजय-विजय ही दोन जुळी भावंड नुकतीच भारतीय सैन्यदलात भरती झाली आहेत. आजपर्यत दोन भाऊ सैन्यदलात कार्यरत असल्यांची अनेक उदाहरणे आहे. मात्र यामधे दोन जुळी भावंड सैन्यदलात भरती होण्याची बहुदा पहिलीच वेळ असावी.
येथील सावरकर मुक्तव्दार वाचनालयाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिकेतील अजय आणि विजय शेटे ही दोन भावंडे गेल्या दोन वर्षापासून स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करीत आहेत. या अभ्यासासोबतच भारतीय सैन्यात भरती होण्याचे या दोन्हीही भावांचे स्वप्न होते. ते आता पूर्ण झाले आहे. भारतीय सैन्यदलातील भरतीचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला. यामधे दोन्हीही जुळ्या भावंडाचा या भरतीमधे नंबर लागला आहे.
अजय-विजय ही भावंडे शालेय जीवनापासून राष्ट्रीय छात्र सेनेमधे कार्यरत होते. यातूनच या दोघांना भारतीय सैन्यांचे आकर्षण निर्माण झाले. येथील कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयांमधे हे दोघेही सध्या पदवीच्या शेवटच्या वर्षामधे शिकत आहे. याच केबीपी महाविद्यालयाच्या मैदानावर या दोघांनीही भारतीय सैन्यदलात भरती होण्यासाठींचा संपूर्ण सराव केला आहे.

अजय-विजय हे ज्ञानेश्वर शेटे यांचे पुत्र आहेत. ज्ञानेश्वर शेटे आणि त्यांच्या पत्नी हा तारापूर येथील शेतशिवारामधे मजुरी काम करतात. अशा परिस्थितीत मोठ्या जिददीने अजय-विजय यांनी भारतीय सैन्यदलात भरती होऊन. आई-वडिलांचे नाव मोठे केले आहे.
विशेष म्हणजे आजपर्यत भारतीय छात्र सेनेचे अनेक शिबिरे तसेच इतरही अनेक कार्यक्रमाना या भावंडानी हजेरी लावली आहे. या दोन्हीही भावंडाची उंची, वजन तसेच फिटनेस हा अगदी एकसारखा आहे. त्यामुळे या दोन्हीही जुळया भावंडाचे सध्या कौतुक होत आहे.
लवकरच अजय-विजय ही भावंडे भारतीय सैन्यदलांच्या प्रशिक्षणासाठी रवाना होणार आहेत. नुकताच येथील सावरकर मुक्तव्दार वाचनालयात या दोघांचाही सत्कार करण्यात आला. यावेळी सावरकर वाचनालयांचे अध्यक्ष वा.ना.उत्पात , उपाध्यक्ष प्रकाशदादाद उत्पात , भाऊसाहेब ताठे , योगेश पडवळे , संतोष भोसेकर , सचिन चुंबळकर, गणेश सुर्वे , रूपाली कांबळे आदिंनी अभिनंदन केले आहे.