जूनमध्ये उजनी 12.50 टक्के वधारली, महिनाभरात 113 मि.मी.पाऊस
पंढरपूर – जून महिन्याच्या अखेरीस उजनी अद्यापही मृतसाठ्यातच असून मागील 28 दिवसात हा प्रकल्प 12.50 टक्के वधारला असून पाऊस व दौंडजवळील आवक यामुळे धरणात जवळपास 6.70 टीएमसी पाणी आले आहे. जलाशयावर 29 जूनपर्यंत 113 मिलीमीटर पावसाची एकूण नोंद आहे.
उजनी धरण उन्हाळा हंगामात वजा 22.42 टक्के अशा स्थितीत 2 जून रोजी होते. यानंतर झालेला पाऊस व दौंडजवळील आवक यामुळे उजनी धरणाची स्थिती 29 जून रोजी वजा 9.91 टक्के अशी आहे. हा प्रकल्प 12.50 टक्के वधारला आहे. उजनीत सध्याही दौंडजवळून 2352 क्युसेकचा विसर्ग मिसळत आहे. मध्यंतरी भीमा उपनद्यांवरील बंधार्यातील पाणी सोडल्याने सर्वाधिक आवक 9 हजार 40 क्युसेकची नोंदली गेली होती.