ज्येष्ठ व दिव्यांग भक्तांना विठुरायाच्या दर्शनासाठी र्ई रिक्षाची मोफत सोय

पंढरपूर, दि.19- मंदिर सुरक्षेच्या कारणास्तव श्री विठ्ठल रखुमाईच्या दर्शनासाठी येणार्‍या सर्वच भाविकांना ठराविक अंतरावरून चालत जावे लागते. अशावेळी ज्येष्ठ व दिव्यांग भाविकांना याचा त्रास होतो हे लक्षात घेवून मंदिरे समितीच्या सदस्या अ‍ॅड. माधवी निगडे व वेणू सोपान वेलफेअर फाउंडेशनच्या वतीने ई रिक्षाची सोय करण्यात आली असून दहा लाख रूपये किंमतीची दोन वाहने मंदिरे समितीला देण्यात आली आहेत.
याचा लोकार्पण सोहळा येत्या रविवारी होणार आहे. सुरक्षेच्या कारणास्तव श्री विठुरायाचे मंदिराकडे जाणारे सर्व प्रमुख रस्ते खासगी वाहनांना बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे वयोवृद्ध भाविकांना प्रदक्षिणा मार्गावरुन मंदिरापर्यत चालत जावे लागत आहे. जेंष्ठ वारकरी व दिव्यांग भाविकांची ही गैरसोय लक्षात घेऊन हा उपक्रम राबविण्यात आला आहे. प्रदक्षिणा मार्ग ते विठ्ठल मंदिर हे अंतर 400 ते 500 मीटर आहे या मार्गावरुन सामान्य भाविकांना वाहने घेवून जाण्यास परवानगी नाही. आता या ई रिक्षांमुळे ज्येष्ठ भाविक व दिव्यांगांची सोय झाली आहे. याचा मोफत लाभ दिला जाणार आहे. एका रिक्षाची किंमत पाच लाख रूपये असून दहा लाख रूपयांच्या दोन रिक्षा यासाठी येथे घेण्यात आल्या आहेत. या बॅटरीवर चालणार्‍या रिक्षा आहेत. याची देखभाल दुरूस्तीही दोन दानशूर भाविक कायमस्वरूपी करणार आहेत. या ई रिक्षा चौफाळा व महाद्वार पोलीस चौकी या ठिकाणी तैनात असणार आहेत.
WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!