दिलासादायक बातमी: कोरोना गंभीर रुग्णांच्या उपचारासाठी राज्य सरकार ‘रेमडेसीवीर’ इंजेक्शनच्या १० हजार व्हॉयल्स खरेदी करणार

मुंबई,दि.६ – कोरोनाच्या गंभीर रुग्णांवर उपचारासाठी राज्य सरकारने ‘रेमडेसीवीर’ इंजेक्शनच्या १० हजार व्हॉयल्स खरेदी करणार असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज सांगितले.

‘रेमडेसीवीर’ हे इंजेक्शन अँण्टी व्हायरल आहे. ‘सार्स’ आजारासाठी वापरण्यात आलेले हे इंजेक्शन त्यावर उपयुक्त ठरल्याने कोरोनावरही ते उपयुक्त ठरू शकते असे जागतिक आरोग्य संघटनेने सुचविले आहे. कोरोनाच्या गंभीर रुग्णांवर या इंजेक्शनचा उपयोग चांगला होऊ शकेल, त्यामुळे राज्य सरकारने १० हजार इंजेक्शन व्हायल्स खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे, असे टोपे म्हणाले.

कॉर्पोरेट कंपन्यांच्या सामाजिक उत्तरदायित्व अर्थात सीएसआर निधीतून या इंजेक्शनची खरेदी केली जाणार आहे. आतापर्यंत काही रुग्णांकडून हे इंजेक्शन वैयक्तीकरित्या खरेदी करून त्याचा वापर झाला आहे. मात्र सर्वसामान्य रुग्णांना ते घेणे परवडणारे नसल्याने सरकारने त्यांच्यासाठी हे इंजेक्शन खरेदी करण्यात येणार आहे. हे इंजेक्शन उपलब्ध झाल्यावर त्याच्या वापराबाबत प्रमाणीत पद्धत अर्थात एसओपी तयार केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!